झासी: उत्तर प्रदेशमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या झासी जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. एका व्यक्तीने कर्जाचे हप्ते(installments) न भरल्याने खासगी बँकेने त्या व्यक्तीच्या पत्नीलाच ओलीस ठेवले आहे. कर्जाचे थकलेले हप्ते भरल्यानंतरच तुमची पत्नी परत मिळेल असे बँकेच्या लोकांनी त्या पतीला सांगितले. या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशच्या झासीमध्ये घडलेला हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेऊयात.

झासीमधील हा प्रकार असून एका खासगी बँकेशी निगडित आहे. झासी जिल्ह्यातील एका व्यक्तीने एका खासगी बँकेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ज्याचा महिन्याचा हप्ता २,१२० रुपये इतकी होती. मात्र हे हप्ते(installments) न भरल्याने बँकेच्या लोकांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला ओलीस ठेवले आणि अनेक तास बँकेत बसवून ठेवले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या महिलेला सोडून देण्यात आले.
पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, कर्जाचे हप्ते न भरल्याने माझ्या बायकोला जबरदस्तीने बँकेच्या आत बसवून ठेवले. जोवर मी पैसे भरणार नाही तोवर माझ्या बायकोला सोडणार नाहीत असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला स्पष्टपणे सांगितले. मी बँकेच्या अधिकाऱ्याना अनेकदा विनंती केली की, मी हप्ता भरण्यास असमर्थ आहे. माझ्या बायकोला सोडून द्या. मात्र माझे अजिबात त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी ११२ वर डायल केले.
अशी घटना घडली आहे याची माहिती मिळताच पोलीस बँकेत दाखल झाले. पोलीस आल्यामुळे बँकेचे अधिकारी कचरले. पोलिसांनी तात्काळ महिलेला बँकेच्या बाहेर सोडून दिले. महिला स्वतःहून बँकेत बसली होती आणि तिचा पती पैशांची सोय करायला बाहेर गेला होता, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी बँकेचे अधिकारी या पती पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावले.
चौकशीनंतर या व्यक्तीने गेले सात महिने घेतलेल्या कर्जाचे होते भरले नसल्याचे समोर आले आहे. तसेच आम्ही महिलेस ओलीस ठेवले नाही तर, महिला स्वतःहून बँकेत बसली होती असे बँकेच्या अधिकाऱयांनी पोलिसांना सांगितले. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासातनूच सत्य काय आहे ते बाहेर येण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा :
सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार
तारदाळ आणि खोतवाडीतील जलजीवन योजनेतील अपूर्ण कामांवरून विनोद कोराणे यांचे बेमुदत उपोषण सुरू
आता बाप्पाची आरती कोण करणार? महादेवी हत्तीचा व्हिडिओ व्हायरल… महादेवीच्या विरहाने व्याकूळ नांदणी