चुकीला क्षमा होऊ शकते मात्र गद्दारीला माफी नाही. अजितदादा इतके दिग्गज नेते असूनही त्यांना गावोगावी भावनिक आवाहन करत फिरावे लागत असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. त्यांना जनतेचा मूड नक्की कळलेला आहे. यंदा पक्ष फोडणारे आणि चिन्हे पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे(Assembly)सरकार येईल अशी टोलेबाजी अमोल कोल्हे यांनी केली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा(Assembly) मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे पंढरपुरात आले होते. यावेळी ते बोलत होते. नुकत्याच आलेल्या सर्वेवर जोरदार टोलेबाजी करताना सर्वे करणारी कंपनी ही अदानी यांची असून ते सध्या भाजपाला खुश करायचं काम करत आहे. मात्र, इतकी करुनही त्यांना 145 ते 165 एवढ्या जागा दाखवाव्या लागत आहेत. भाजपाला खुश करण्यासाठी कितीही रेटलं तरी त्यांना काठावरच्या बहुमताच्या पुढे जाता येत नसल्याचे सर्वे दाखवत आहेत. यामुळं केवळ काठावरचे मतदार जे आहेत त्यांना भ्रमित करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी असे सर्व दिले जात आहेत. ही कंपनी पूर्वी अनिल अंबानी यांची होती नंतर ती अदानी यांनी विकत घेतली. हजारो कोटींची गुंतवणूक असणाऱ्या उद्योगपतींना आपला इंटरेस्ट साध्य करण्यासाठी असे करावे लागते. मात्र महाराष्ट्राने आपलं मत पक्कं केला असून आता कोणत्याही परिस्थितीत महायुती सत्तेत येणार नाही असा टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला.
हेलिकॉप्टर मधून आल्यावर माझीही बॅग तपासली होती, पण त्यात काय निघणार प्रामाणिकपणा आणि निष्ठा असे अमोल कोल्हे म्हणाले. आम्ही काय सुरत गुवाहाटी फिरलेलो नाही, त्यामुळं जरी कायद्याने ही तपासणी आवश्यक असली तरी पंतप्रधान अमित शाह मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या कधी बॅगा तपासल्याचे ऐकिवात नसल्याचाा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट संपूर्ण ताकद अनिल सावंत यांच्या मागे उभी केली ज्या खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचेही कोल्हे म्हणाले.
काँग्रेसने दिलेला उमेदवार काही दिवसापूर्वी बीआरएसच्या विमानातून जाताना आम्ही पाहिला होता नंतर कुठे कुठे फिरून परत आलेला दिसतोय असा टोलाही कोल्हे यांनी भगीरथ भालके यांना लगावला. तो नक्की काँग्रेसचा तरी आहे का? याची खात्री काँग्रेसवाल्यांनी करून घ्यावी असा चोलाही कोल्हे यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला गिनतीत नसल्याची टीका करणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनाही अमोल कोल्हे यांनी टोला लगावला. असं बोलताना त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केलेली दिसत नाही असेही कोल्हे म्हणाले.
हेही वाचा :
राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच बाप लेकीचा राजकीय संघर्ष
शरद पवारांनी गेम पलटवला! बड्या नेत्याला मोठा धक्का
सेलिब्रिटी मायलेकीतील वाद न्यायालयात; रुपाली गांगुलीनं सावत्र मुलीवर ठोकला 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा