कायम दिशादर्शक

आयुषी खुराणा, अभिनेत्री
माझी आई माझ्या आयुष्यातील दिशादर्शक आणि माझ्या आंतरिक शक्तीचा स्रोत आहे.(led lights) माझा स्वतःवरदेखील विश्वास नव्हता, त्यावेळी तिनं माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या आयुष्यात आणि करिअरमध्ये मी जी काही उंची गाठली आहे, ती केवळ तिची श्रद्धा आणि प्रेमामुळेच.

तिनं आपल्या शब्दांमधून आणि कृतींमधून मला ताकद दिली. दयाळू आणि (led lights)विनम्र राहायला शिकवलं. मी आयुष्यात जे काही मिळवले आहे, ते तिचा त्याग, मूल्यं आणि रोजचे कष्ट यामुळेच. ती कायमच माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती राहील.

मला आजही आठवतंय, २०१०मध्ये मध्ये झालेल्या दंगलीत आमच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेलं माझ्या वडिलांचं दुकान जाळण्यात आलं होतं. तो आमच्या कुटुंबासाठी मोठा धक्का होता.(led lights) बाबा तर अगदी खचून गेले होते. पण माझ्या आईनं आम्हाला एकत्र ठेवलं.

तिनं आम्हांला केवळ आर्थिक आधारच दिला नाही, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही सांभाळलं. तेव्हा ती नोकरी करत होती आणि त्या काळातून बाहेर पडण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली. तिच्यामुळे आम्हाला फारशा आर्थिक विवंचनेतून जावं लागलं नाही. तो काळ आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा होता आणि तिच्याच बळामुळे आम्ही त्यातून बाहेर पडू शकलो.

माझ्या आईचं नृत्य, अभिनय अशा कलात्मक गोष्टींवर अतिशय प्रेम आहे आणि तेच प्रेम माझ्यातही उतरलं आहे. तिला आनंदानं आणि बिनधास्तपणे भावना व्यक्त करताना पाहणं माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिची ही आवड माझी आवड बनली आहे. आज नृत्य आणि अभिनय या गोष्टी माझ्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत. कारण, त्या आधी तिच्या आयुष्याचा हिस्सा होत्या.

आईची इच्छाशक्ती मला अतिशय आवडते. ती जेव्हा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते, तेव्हा ती गोष्ट शिकल्याशिवाय थांबत नाहीत. एखादी गोष्ट सोडून देणं, तिच्या शब्दकोशातच नाहीये. तिचं सातत्य, एकाग्रता आणि शिस्त मला दरदिवशी प्रेरणा देते. ती घर सांभाळत असो किंवा आपली व्यावसायिक जबाबदारी पूर्ण करत असो, ती जे काही करते ते अगदी पूर्ण मनापासून करते. ती कधीच रिकामी नसते, कायम सक्रिय, कायम काहीतरी नवीन शिकत असते. तिचे हे गुण मला माझ्या आयुष्यात घ्यायला आवडतील.

मी सध्या ‘झी टीव्ही’वर ‘जाने अनजाने हम मिले’ या मालिकेत रीतची भूमिका साकारत आहे. माझ्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मी सर्वांचीच चाहती झाली आहे. माझ्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत असताना मला ॲवॉर्डही मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या ‘झी रिश्ते ॲवॉर्ड्स’मधील आठवण माझ्यासाठी खास आहे.

‘जाने अनजाने हम मिले’ या मालिकेसाठी मला ‘बेस्ट बेटी ॲवॉर्ड’ मिळत असताना, माझ्या आईलाही मंचावर माझ्यासोबत बोलावण्यात आलं. त्याक्षणी तिच्या चेहऱ्यावर मी जो आनंद आणि अभिमान पाहिला, तेव्हा त्यामुळे मला अतिशय सुंदर देणगी दिल्यासारखं वाटलं. त्याक्षणी तिच्या डोळ्यांतील चमक आणि आनंदच सगळं काही सांगत होतं.

त्याप्रसंगी मला गहिवरून आलं होतं. कारण पुरस्कार तर मिळालाच होता; पण त्याक्षणी माझी आई माझ्यासोबत मंचावर उपस्थित होती. त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. खरंतर हा प्रसंग मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असेच आहेत. मला वाटतं ती माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम आठवण आहे.

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट