आरोपीचा महिलांशी संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता, याचीही माहिती मिळवण्याचे काम स्थानिक गुन्हे(crime) शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. आरोपी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याचं देखील समोर आलं आहे.

महिलांशी शारीरिक संबंध अन् नंतर हत्या, जळगावच्या जंगलात सुरू होता खुनी खेळ, आरोपीचा सीडीआर पाहून पोलीस हादरले
जळगावमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे,(crime) एका व्यक्तीने महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर या महिलांची हत्या करून त्यांना जंगलातच गाडलं, ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनिल संदानशिव असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, आता पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहे.
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची हत्या करणाऱ्या आरोपीचे इतरही अनेक महिलांशी फोनवरून संभाषण झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.(crime) आरोपीचे सिडीआर काढल्यानंतर त्याने अनेक महिलांशी संभाषण केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे आरोपीने आणखी काही महिलांचा खून केला आहे का? हे तपासण्यासाठी आता स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. आरोपी अनिल संदानशिव याने ज्या महिलांसोबत फोनवरून संभाषण केलं, त्या महिला जिवंत आहेत का? की त्यांनाही मारण्यात आलं आहे? याची माहिती काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथक रवाना झाले आहेत.
दरम्यान आरोपीचा महिलांशी संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता, याचीही माहिती मिळवण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. आरोपी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. आरोपी अनिल संदानशिव याने आणखी गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची दगडानं ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता, या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी अनिल संदानशिव याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हा विवाहित महिलांना लक्ष्य करायचा. तो त्यांच्याशी सुरुवातीला गोड बोलायचा, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो जंगलात जाऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा त्यानंतर त्यांची हत्या करायचा. पोलिसांना दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.
हेही वाचा :
अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?