आपल्याला काहीही समस्या असेल तर किंवा बरं वाटत नसेल(sick)अशावेळी शरीर काही ना काही संकेत देत असतं. मग ते हात असतील पाय असतील किंवा जीभ असेल. फार कमी लोकांना कल्पना आहे की, आपल्याला आजाराचे संकेत हे जीभेच्या माध्यमातून देखील समजतात. यावेळी जीभेचा रंग तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी माहिती देतो.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जिभेचा रंग आणि पोत तुमच्या आरोग्याबद्दल बरीच माहिती देतात. बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र जिभेच्या रंगात बदल होणं हे शरीरात सुरू असलेल्या आजारातचं लक्षण असू शकतं. जर तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर तुमची जीभ आरशात पाहत नसाल तर आतापासून ती सवय लावा.

ज्यावेळी शरीरात कोणताही संसर्ग, व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोनल बदल किंवा इतर कोणताही गंभीर आजार होतो तेव्हा जिभेचा रंग बदलू लागतो. (sick)जिभेचे वेगवेगळे रंग कोणत्या आजाराचे संकेत देतात ते आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया.
गुलाबी रंगाची जीभ
जर तुमची जीभ सामान्य गुलाबी रंगापेक्षा खूप फिकट गुलाबी किंवा जवळजवळ पांढरी दिसत असेल, तर ॲनिमिया किंवा डिहायड्रेशनचा धोका असू शकतो. शिवाय व्हिटॅमिन बी १२ (B12) आणि फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे जीभ लाल आणि गुळगुळीत दिसू शकते
लाल जीभ
जर तुमची जीभ लाल आणि चमकदार होत असेल तर तुमच्या (sick)शरीरात व्हिटॅमीनची कमतरता असू शकते. यामुळे जीभेवर सूज येण्याचा धोकाही असतो. यामुळे तुम्हाला वेदना देखील होऊ शकतात.
जीभ पिवळी पडणं
जीभेचा रंग पिवळा होणं हे अनेक गोष्टींचं लक्षण असू शकते. बऱ्याचदा, ही केवळ तोंडाच्या खराब स्वच्छतेमुळे, म्हणजे जिभेवर मृत पेशी, बॅक्टेरिया आणि अन्नाचे कण जमा झाल्यामुळे होतं. याशिवाय धूम्रपान किंवा काही विशिष्ट पदार्थ व पेयं (उदा. कॉफी, काळा चहा) यांच्या अतिसेवनामुळेही जीभ तात्पुरती पिवळी दिसू शकते.
जीभ पांढरी पडणं
जर तुमची जीभ पांढरी पडत असेल तर ते फंगल इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. शिवाय डिहायड्रेशन किंवा पचन तंत्रामध्ये गडबड झाल्यामुळे देखील हे लक्षण दिसून येण्याची शक्यता असते.
हेही वाचा :
नागरिकांनो सतर्क राहा! राज्यात पावसाचा ‘हायअलर्ट’ जारी
टी20 वर्ल्डकप 2026 चं वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना