भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना(match) सुरू आहे. अन् या सामन्यात भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल अशी आशा फॅन्स मंडळी व्यक्त करताहेत. पण याच पार्श्वभूमीवर मॅच सुरू होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला वर्ग शुभमन गिलची वाट पाहाता दिसतोय.
दरम्यान एका तरुणीनं रोहितला जोरजोरात हाक मारून प्लीज शुभमनला बोलव अशी विनंती केली. यावर रोहितनं तिला जे उत्तर दिलं ते ऐकून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
चौथा कसोटी सामना(match) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरू आहे. ही मॅच सुरू होण्यापूर्वी सरावादरम्यान ही घटना घडली होती. तर घडलं असं की, भारतीय टीम सराव संपवून हॉटेलमध्ये परतत होते. त्यावेळी काही तरुणी शुभमन गिलला पाहण्यासाठी मैदानात आल्या. पण शुभमन त्यांना दिसला नाही.
परिणामी त्यांनी रोहित शर्माला हाक मारून प्लीज शुभमनला बोलव. आम्हाला त्याला पाहायचं आहे अशी विनंती केली. यावर रोहित आपल्या नेहमीच्या टपोरी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘अरे कुठून बोलवू तो इथे नाहीये’. यावर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
हा व्हिडीओ revsportz_official या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ४४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कोणी म्हणतेय, या तरुणींनी क्रिकेटचा C सुद्धा माहित नसेल. तर कोणी म्हणतेय, समोर रोहित आणि विराट असताना ती शुभमनला का बोलावतेय. असो तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या मजेशीर प्रतिक्रिया द्या.
हेही वाचा :
CBI मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात…
प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहने वयाच्या २५व्या वर्षी संपवलं जीवन…
‘इंडिया’ आघाडीत फूट? ‘या’ कारणामुळे आम आदमी पक्षाने काँग्रेसवरच घेतला आक्षेप