इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग – संजय तेलनाडे समर्थक सोशल मीडियावर सक्रिय

इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत शासनाने नुकताच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिका(political) निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. इचलकरंजी शहरास महानगरपालिका दर्जा मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता व चुरस पाहायला मिळत आहे.


महापौरपदासाठी आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, कोणताही पक्ष बाजूला राहिलेला नाही. प्रत्येक पक्षाचे स्थानिक नेते महापौरपदाची संधी मिळावी यासाठी रणनीती आखत आहेत. यातच माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांचे समर्थकदेखील मागे राहिलेले नाहीत.

संजय तेलनाडे हे शहरातील सक्रिय व अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या नेतृत्वात अनेक विकासकामे झाल्याचा दाखला देत त्यांच्या समर्थकांनी सध्या सोशल मीडियावर(political) त्यांच्या समर्थनार्थ मोहीम उघडली आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, इंस्टाग्राम पोस्टद्वारे “महापौर फक्त st सरकार” अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

या घडामोडींमुळे संजय तेलनाडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाला संधी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा :

उत्तम-प्रकाश टॉकीज चौकात अपघात टळला – सजग नागरिक आणि प्रमोद बचाटे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

महापालिका रणधुमाळीला प्रारंभ : सुरेश हाळवणकर यांच्याकडून भाजपच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू