कोल्हापूर/ दीपक घाटगे : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरच्या राजकारणात(Political) मोठ्या घडामोडी घडत असून, अनेक नेते पक्षांतर करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गाठीभेटी वाढल्या असून नेतेमंडळी मळ्यात आणि कार्यकर्ते तळ्यात अशी अवस्था जिल्ह्यात दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के. पी. पाटील, ए. वाय. पाटील या मेव्हण्या पाहुण्यांच्या बरोबरच भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर अन्य काही नेते पक्षांतर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अनेक राजकीय(Political) नेत्यांनी त्यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मंडपात उभे राहिले आहेत. एका पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जायचे, असा मनसुबा नेत्यांनी आखला आहे. खासदार पवार कोल्हापूरात आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
राहुल देसाई राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. जिल्ह्यातील भाजपचा दुसरा मोहरा देखील खासानर पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. राहुल देसाई माजी आमदार बजरंग देसाई याचे चिरंजीव आहेत. राहुल देसाई यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची एकत्रित घेतली भेट घेतली. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यानंतर आता राहुल देसाई निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळणार आणि काय गणित ठरणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.
अजित पवार गटाच्या के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असून खासदार पवार यांच्या भेटीनंतर के. पी. पाटील यांनी अजित पवार गटासाेबत काडीचा संबंध नसल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील राधानगरी भुदरगड विधानसभा(Political) मतदरासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोन्ही नेते अजित पवार गटात होते. मात्र, या दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. आता या दोन्ही नेत्यांमधून कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हातकणंगले मतदारसंघातून माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनीही शरद पवारांची भेट घेतली. सध्या ते शिवसेनेत असले तरी शिंदे गटाकडे त्यांचा कल असल्याने निवडणूक लढवणारच, असा मनसुबा त्यांनी आखला आहे मात्र कोणता झेंडा हाती घेणार, यावर त्यांची उमेदवारी ठरणार आहे. शिरोळ मतदार संघामध्ये माजी खासदार निवेदिता माने या इच्छुक आहेत. मात्र त्या मैदानात उतरणार का असा पण प्रश्न आहे. शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला वेग येणार आहे. नेते मळ्यात, कार्यकर्ते तळ्यात, अशी अवस्था पहायला मिळत आहे.
हेही वाचा:
पंतप्रधानांची गणेश पूजा! सुरू झाली, उलट सुलट चर्चा
सांगली महापालिकेला रोज एक लाख रुपये दंड; कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी कारवाई
मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून सावत्र आईने गाठला क्रुरतेचा कळस कोल्हापुरातील घटना