पोस्टमन मामा या दिवशी येणार नाहीत — 21 जुलै रोजी पोस्ट ऑफिसचे व्यवहार बंद राहणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस(Post Office) व्यवहारात मोठा बदल होत असून, 22 जुलै 2025 पासून कोल्हापूर प्रधान डाकघर अंतर्गत येणाऱ्या 44 पोस्ट ऑफिसमध्ये IT 2.0 या नव्या डिजिटल प्रणालीचा शुभारंभ होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पोस्टल सेवा अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील गरजांसाठी सुसज्ज बनविण्याचा उद्देश आहे.

या प्रणालीचा भाग म्हणून 21 जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये(Post Office) सार्वजनिक व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. कारण या दिवशी नव्या प्रणालीसाठी आवश्यक तांत्रिक बदल व सुरक्षित डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी नियोजित डाउनटाईम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी कोणीही पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहारासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी जनतेला आवाहन केले आहे की, 21 जुलै रोजीच्या या तात्पुरत्या अडथळ्यात सहकार्य करावे व आपल्या पोस्टल गरजांचे योग्य नियोजन करूनच व्यवहार करावेत. नव्या युगातील या डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना अधिक जलद, अचूक व सुरक्षित सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी

‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका

कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली