कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्य वापरत असतीलच.(appreciation)हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. कोल्हापुरी चपला या चमड्याचा आणि हाताने तयार केलेल्या असतात. याच चपलांची नकल करुन अनेक चपला बाजारात सहज विकल्या जातात. मात्र आता ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरी चपला प्राडाच्या फॅशन शोमध्ये वापरली आहे.

दरम्यान कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ प्राडाच्या माध्यमातून उपलब्ध होईल असा विश्वास अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला आहे. (appreciation)प्राडाच्या सहा सदस्यांनी आज सकाळी कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधला. तसेच कोल्हापुरी चपलांचे विविध प्रकार बघून प्राडाचे सदस्य अक्षरशः थक्क झाले. कोल्हापुरी चपलेचे एवढे प्रकार असतात हे प्राडाच्या सदस्यांनी पहिल्यांदाच समजलं.

तसंच प्राडाच्या फॅशन शोमध्ये वापरली गेलेली चप्पल ही कोल्हापुरीच असल्यास देखील आता स्पष्ट झाले. (appreciation)महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या समवेत कोल्हापुरी चपलांची चपलांच्या दुकानांची पाहणी करत सदस्यांनी ही माहिती घेतली आहे. प्राडाच्या तज्ञ समितीने आज कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल लाईनची पाहणी केली आणि चप्पल विक्रीची माहिती घेतली. यावेळी कोल्हापुरातील दुकानांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चपला पाहून तज्ञ समितीने आश्चर्य व्यक्त केले.यावेळी चप्पल व्यापाऱ्यांनी त्यांना काही चपला भेट म्हणून देखील दिल्या. महाराष्ट्रातील कोल्हापुर शहर तसेच सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकमध्ये कोल्हापुरी चपला या खूप मेहनीचे हाताने तयार केल्या जातात. त्यामध्ये खिळे किंवा कृत्रिम पदार्थ वापरले जात नाहीत.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; ‘या’ पक्षासोबत युती
मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करा, राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी…