प्रसाद लेले यांची हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड

हातकणंगले, कोल्हापूर : देशभरातील ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने प्रसाद लेले यांची हातकणंगले तालुकाध्यक्षपदी(President) नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नितीनभाऊ लातुरकर यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

ब्राह्मण समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी केलेली ही निवड अत्यंत स्वागतार्ह असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. प्रसाद लेले हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्याकडे नेतृत्वगुण, समाजसेवा आणि संघटन क्षमता यांचा उत्तम संगम आहे. त्यांच्या निवडीमुळे हातकणंगले तालुक्यात ब्राह्मण समाज अधिक संघटित होईल व विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उद्दिष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाच्या एकात्मतेसाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करणे. या पार्श्वभूमीवर प्रसाद लेले यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ही समाजहिताच्या दृष्टीने मोलाची आहे. या निवडीबद्दल प्रसाद लेले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?

पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral