प्रचार की डान्स शो? धैर्यशील माने यांच्या प्रचारात चक्क गोविंदाचे ठुमके!

इचलकरंजी : बॉलिवूड अभिनेता गोविंदा यानं इचलकरंजी लोकसभा(promotion) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धर्यशील माने यांच्या प्रचारात एका बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ताराराणी पक्षाच्यावतीनं आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली(promotion) इचलकरंजी इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला होता.

या महिला मेळाव्याला आज सिनेअभिनेता आणि शिंदेंच्या शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदाने हजेरी लावली. यावेळी गोविंदानं आपल्या डान्सनं महिलांची मन जिंकली. यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी बोलताना गोविंदानं देशात मोदी सरकार आणायचं आहे त्यामुळं धैर्यशील मानेंना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी महिला वर्गावर आहे, असं सांगितलं. यावेळी गोविंदाला पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (30-04-2024)

भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; १ महिला जखमी, वातावरण तापलं

कागलकरांनो, वचपा काढण्याची संधी सोडू नका; महाडीकांनी सतेज पाटलांच्या डावपेचावर…