धाराशिव: जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे ठाकरे(workers) आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून ३ ते ४ जण जखमी झालेत. मिळालेल्या माहिती असून मृत्यू झालेला व्यक्ती हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
आज लोकसभा निवडणुकाच्या मतदानाचा(workers) तिसरा टप्पा पार पडतोय. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी देखील मतदान होत आहे. येथील मतदानकेंद्रावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
उद्धव बाळासाहेब गटाचे ५ ते ६ कार्यकर्ते हल्ल्यात जखमी झालेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ३ ते ४ कार्यकर्त्यांवर शिंदे गटाच्या २० ते २२ कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

सांगोला तालुक्यातील महूद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात हाणामारी झाली यामध्ये दोन्ही गटातील ५ते ६ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
हातकणंगलेमध्ये गोंधळ, धैर्यशील माने आणि सरुडकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा हाणामाऱ्यांनी गाजला! महाराष्ट्रात ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा