जालना जिल्ह्यात 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद
जालना जिल्ह्यात जवळपास 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले(district) आहेत. ही योजना सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख 42 हजार 392 अर्ज दाखल झाले होते.

आज मिरा रोड येथे धडाडणार राज ठाकरे यांची तोफ
8 जुलै रोजी पोलिसांचा बंदी आदेश झुगारून मनसैनिकांनी आणि मराठी(district) नागरिकांनी उत्सफूर्त मोर्चा काढला होता आणि त्याच अनुषंगाने मनसैनिक आणि मराठी नागरिकांना शाबासकीची थाप देण्यासाठी राज ठाकरे आज मिरा रोड येथे येत आहेत. मुंबईची लाईफलाईन रेल्वेत ही राज ठाकरेंच्या आजच्या सभेची चर्चा आहे.
“महिलांना रूढी पूर्तीच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना मोकळं रान द्यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन. आपल्या देशातील 142 कोटी समाज जेव्हा देशासाठी कार्य करेल तेव्हा देशाचा विकास होईल, देशाचे भाग्य बदलेल. केवळ मूठभर लोकं काम करतील तर त्यामुळे देशाचे (district)भाग्य बदलणार नाही. महिला घटक उभारणे गरजेचे आहे, कारण त्याचं देशाचे भाग्य बदलू शकतात” असं मोहन भागवत म्हणाले. सोलापुरातील उद्योगवर्धिनी या महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत सोलापुरात आले होते. जालन्याच्या घनसावंगी मंठा आणि परतूर या 3 तालुक्यात सर्व जोरदार पावसाची हजेरी. 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाचं जोरदार कमबॅक. शेतकऱ्यांच्या शेतात साचलं पाणी,तळ्याच स्वरूप प्राप्त. पावसामुळे सुकलेल्या पिकांना मिळालं जीवदान तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान. घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव आणि पानेवाडी शिवारात शेतकऱ्यांची सोयाबीन गेली पाण्याखाली.
हेही वाचा :
आंनदाची बातमी! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी दोन मुले,मोठ्या जिद्दीने झाली IPS; एन अंबिका यांचा प्रवास
मौलाना आझाद कर्ज योजनेत अर्जदारांची फसवणूक; कर्ज मंजूर झालं, मग पैसे गेला कुठे?