राजेंद्र पाटील यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार

मुंबई: भाजपा(politics) प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री राजेंद्र बंडू पाटील यांचा सत्कार मुंबई येथे करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विस्तारक म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा गौरव मिळाला आहे.

श्री पाटील यांनी गेल्या वर्षभरात हातकणंगले लोकसभा(politics) मतदारसंघातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात विस्तारक म्हणून काम केले. त्यांनी बुथस्तरावर अत्यंत नियोजनबद्धरीत्या काम करत मतदारसंघात चांगले यश मिळवले. यानंतर त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही अतिशय उत्साहाने काम करून पक्षासाठी उल्लेखनीय यश खेचून आणले.

त्यांच्या या सत्कार सोहळ्यात चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी पाटील यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठीही असेच कार्य अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. पाटील यांनी या सत्काराने नव्या ऊर्जा आणि प्रेरणेची अनुभूती झाल्याचे सांगितले.

“घरापासून दूर राहून, प्रत्येक बुथवर सातत्याने काम करत पक्षासाठी यश खेचून आणणे हे आव्हानात्मक होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले,” असे पाटील म्हणाले. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी त्यांनी पुन्हा नव्या जोशात काम करण्याची तयारी दर्शवली.

सत्कार समारंभास भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. हा सोहळा कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरला.

हेही वाचा :

धनंजय मु्ंडेंच्या कार्यकर्त्याने खुलेआम केला हवेत गोळीबार

रोहित शर्मा जडेजावर भडकला! म्हणाला – त्याला आऊट कोण करणार मग? व्हिडीओ व्हायरल

भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी