कोल्हापूरात रेशन दुकानदारांना मिळणार 5G पॉस मशीन; धान्य वितरणाला येणार गती

कोल्हापूर : जिल्ह्यातील रास्त भाव(ration) धान्य दुकानदारांना आता फाईव्ह जी पॉस मशीन दिली जाणार आहेत. त्यामुळे धान्य वितरणाला गती येणार असून पावती करणे, थंम्ब इंप्रेशन घेणे यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणीही दूर होणार आहेत. सध्या जिल्ह्यातील तीन तालुक्यांत या मशीनचे वाटप सुरू असून, पुढील महिन्याभरात जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांत ही मशीन असणार आहेत.

रेशन(ration) धान्य दुकानदारांकडे ई पॉज मशीन देण्यात आले आहेत. यावर ग्राहकाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन मग त्यांना धान्य दिले जाते. ठसा घेतला की त्याची नोंद आपोआप होते. यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. सध्या जे ई पॉज मशीन आहेत, त्यामध्ये टु जी इंटरनेट आहे. याची गती कमी असल्याने धान्य वितरणाला वेळ लागतो.

याशिवाय मशीन बंद पडण्याच्या पण तक्रारी आहेत. काही जणांचे ठसे उमटायला वेळ लागतो, त्यामुळे पावतीही पटकन मिळत नाही. सध्या देशात सर्वत्र ‘फाईव्ह जी’ प्रकारचे इंटरनेट वापरले जाते. याला गती अधिक असते. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांना फाईव्ह जी पॉस मशीन दिली जाणार आहेत. त्यामुळे आता धान्य वितरणाला गती मिळेल.

हेही वाचा :

कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

‘हेलिकॉप्टरमधून ९ बॅगा, CM शिंदेंकडून १२- १३ कोटींचे वाटप’; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात