मुंबई: “महाराष्ट्राला(political issues) दादा-भाईंची गरज नाही आणि गुजरातमधून आलेल्या गां*** भाईंची तर अजिबात गरज नाह. तुमच्या हातात सत्ता, पैसा, केंद्रीय यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही भाई. ही सगळी आयुध गळून पड्ल्यावर आमच्याशी भाईगिरी करा. पोलीस, इडी,सीबीआय तुमच्या हातात आहे. त्याचा तुम्ही विरोधकांना जेरबंद कऱण्यासाठी गैरवापर करत आहात.
तरीही महाराष्ट्राने(political issues) तुमचा पराभव केला. हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या समोर. ही वर्दी आणि केंद्रीय यंत्रणांची मस्ती आहे ना, ती आहे म्हणून तुमची मस्ती आहे. पण महाराष्ट्र असं राज्य आहे जो सर्वांचा माज उतरवून देतो,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनाच आव्हान दिलं आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर निशाणा साधला आहे. य़ाचवेळी “महाराष्ट्राचे दोन धंदे आहेत, पहिला म्हणजे देशाचे संरक्षण कऱणं आणि दुसरा माजुरड्यांचा माज उतरवून देणं. ही महाराष्ट्राची खासियत आहेत. त्यांना ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावं.” असही त्यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “अमित शाहांनी महाराष्ट्रात औरंगजेबाप्रमाणे स्वत:चे तंबू ठोकले तरी भाजप आणि त्यांचे नेते विजयी होणार नाहीत, विजयी होण्याचा मार्ग सरळ आणि प्रशस्त होत आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे दिल्लीतील लोकांना कळत नसेल तर आणि ते राज्यातील त्यांच्या पक्षातील नेत्यांवर दबाव टाकत असतील तर निकालानंतर त्यांना कळेल की त्यांनी सत्तेवर अत्यंत तकलादू आणि बोगस माणसे बसवली होती.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून त्यांनी त्यांच्या हातात राज्याची सत्ता दिली, पण ही सत्ता चालवायला आणि राज्याचा विकास करायला ते अजिबात लायक नव्हते. पण अमित शाहांचा हट्ट होता. जसा औरंगजेबाचा महाराष्ट्राला लुटण्याचा आणि महाराष्ट्र काबीज कऱण्याचा हट्ट होता, तसाच अमित शाह हट्ट करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता त्यांच्या या हल्ल्याला चोख उत्तर देईल, अशी जहरी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा:
भाजपचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला; दसऱ्यानंतर सीमोल्लंघन होणार
“प्रसिद्ध YouTuber वर अभिनेत्रीचा लैंगिक अत्याचाराचा आरोप; अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा गंभीर दावा!”
‘या’ आठवड्यात मनोरंजनाचा फुल्ल तडका, ओटीटीवर रिलीज होणार ॲक्शन-थ्रिलर चित्रपट