बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई संघ आयपीएल(ipl game) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या पराभवासह कदातिच महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील प्रवासही संपला आहे. हा आयपीएल हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा असण्याची शक्यता आहे. हा पराभव महेंद्रसिंग धोनीच्या फारच जिव्हारी लागला. याचं कारण डगआऊटमध्ये बसलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंशी हँडशेक न करताच ड्रेसिंग रुममध्ये गेला.
दरम्यान भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि इंग्लंडचा माजी कर्णधार(ipl game) मायकेल वॉन यांनी बंगळुरुच्या खेळांडूंवर नाराजी व्यक्त केली आहे. धोनी आऊट झाल्यानंतर बंगळुरुच्या खेळाडूंनी त्याचा हा अंतिम सामना असू शकतो हे माहिती असतानाही हँडशेक न केल्याने त्यांनी सुनावलं आहे.
बंगळुरुच्या खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनी आऊट झाल्यानंतर त्याचा सन्मान राखत मैदानातून निरोप द्यायला हवा होता असं हर्षा भोगले आणि मायकल यांना वाटत आहे. 42 वर्षीय धोनीने अद्याप अधिकृतपणे आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही, मात्र हा त्याचा शेवटचा हंगाम होता अशा जोरदार चर्चा आहेत.
“त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही विश्वचषकातील अंतिम सामना जिंकलात, तरीही विरोधी संघाशी हस्तांदोलन करता. आपल्या खेळातील ही एक मोठी गोष्ट आहे. कारण आता आपलं वैर संपलं आहे, या वस्तुस्थितीचं ते प्रतीक आहे. हा फक्त एक खेळ होता आणि आता आपल्यात काही नाही,” असं हर्षा भोगले यांनी Cricbuzz ला सांगितलं”.
य़ानंतर मायकल वॉननेही यावर भाष्य केलं. “खेळाडूंनी जागरुकता दाखविण्याची गरज होती. महेंद्रसिंग धोनीचा तो शेवटचा सामना होता का हे आपल्याला माहिती नाही. पण खेळाडू मैदानात सेलिब्रेशन करत धावत होते. त्यांनी थांबायला हवं होतं. एक महान खेळाडू तिथून जात असताना त्यांनी प्रतिक्षा करायला हवी होती. आपण जाऊन त्याच्याशी हात मिळवायला हवा असं त्यांनी म्हणायला हवं होतं,” असं मायकलने सांगितलं.
“तुम्ही हस्तांदोलन केल्यानंतर उड्या मारु शकता. मी जर बंगळुरुचा खेळाडू असेन आणि उद्या महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर आपण साधं जाऊन त्याच्याशी हातही मिळवला नाही याची खंत वाटू नये,” असं मायकलने सुनावलं.
सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी डगआऊटमध्येच बसला होता. पराभव झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होते. सामना संपल्यानंतर तो इतर खेळाडूंसह हस्तांदोलन करण्यासाठी मैदानावरही उतरला नाही. तो उठला आणि थेट ड्रेसिंग रुमच्या दिशेने चालत गेला. फक्त बंगळुरुच्या सपोर्ट स्टाफशी त्याने हात मिळवले. एकीकडे यावरुन काही चाहते दु:ख व्यक्त करत असतना काहीजण मात्र ही खिलाडीवृत्ती नसल्याचं म्हणत आहेत.
हेही वाचा :
संजय शिरसाट यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा गौप्यस्फोट
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल
तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर