वाचा, मोदी काय म्हणाले; चित्रपट आला म्हणून महात्मा गांधी जगाला कळले!

महात्मा गांधी(mahatma gandhi) एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. गांधींजींना कुणी ओळखत नव्हते. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण 75 वर्षांत काहीही केले नाही.

महात्मा गांधी (mahatma gandhi)यांना कुणीही ओळखत नव्हते. त्यांच्या आयुष्यावर ‘गांधी’ हा चित्रपट आल्यानंतर ते जगाला कळले, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून जगभरात गांधींजींची प्रसिद्ध झालेली छायाचित्रे त्यांच्याबद्दलचे लेख सोशल मीडियातून व्हायरल होऊ लागले आहेत. राजकीय वर्तुळातूनही त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींच्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी फक्त एंटायर पॉलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना ‘गांधी’ सिनेमा बघण्याची गरज पडली असेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनीही मोदींना जोरदार टोला लगावला आहे. श्रीनिवास बीव्ही यांनी जगभरातील वृत्तपत्रांमधील पह्टो शेअर करत मोदींना उत्तर दिले आहे. ज्यांचे वैचारिक पूर्वज नथुराम गोडसेसह महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी होते, ते बापूंनी दिलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
बरे झाले नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्याआधी महात्मा गांधी यांचे पुतळे जगभरात उभे राहिले. नाहीतर मोदींनी बेन किंग्सले यांचे पुतळे जगभरात उभारले असते, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. मोदींचे विधान म्हणजे सूर्याला मोबाईलची टॉर्च दाखवण्यासारखे आहे. गांधीजींची एक ओळही वृत्तपत्रांची हेडलाईन बनायची. ते लंडनमध्ये जायचे तेव्हा तेथील रस्ते जाम व्हायचे. गांधीजींना नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर पिंग आपले प्रेरणास्थान मानायचे तर चार्ली चॅप्लीन आणि आईनस्टाईन त्यांना आपला आदर्श मानायचे. तब्बल 100 देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत आणि ते महात्मा गांधी आहेत, गांधी सिनेमात गांधींची भूमिका साकारणारे बेन किंग्सले नाहीत, असा टोला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी लगावला आहे. तर मोदी अशा जगात राहात आहेत ज्या जगात 1982 पूर्वी महात्मा गांधी यांना जगभरात मान्यता मिळाली नव्हती. महात्मा गांधी यांचा वारसा कुणी नष्ट करण्याचे काम केले असेल तर ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. मोदींनी गांधीजींचा अवमान केल्याचे के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. तर अल्बर्ट आईनस्टाईनचे नाव मोदींनी ऐकले आहे का? आईनस्टाईन यांनी गांधीजींबद्दल काय म्हटले होते हे मोदींना माहीत आहे का? असा सवाल काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे.

…तर गांधीजींनी हात जोडले असतील

पंतप्रधान मोदींची मुलाखत पाहून जगभरातील गांधीजींच्या पुतळ्यांनी हातातील काठी भिंतीला टेकवून ठेवली असेल आणि टिव्हीसमोर जाऊन कोपरापासून हात जोडले असतील, असा टोला एका पोस्टमधून लगावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर गाजले हे मुद्दे

-गांधी चित्रपट 1982 साली आला. त्याच्या पन्नास वर्षे आधी म्हणजे 1932 साली जर्मन भौतिकशास्त्र्ाज्ञ आईनस्टाईनने या जगात कुणालाच माहित नसलेल्या आणि जगभरात ज्यांचे पुतळे आहेत अशा व्यक्तिला म्हणजेच गांधीजींना पत्र पाठवले होते.

– गांधी कुणालाही माहित नसतानाही अमेरिकेतल्या न्यूयॉर्कस्थित टाईम मॅगझिनने 1930 साली गांधींचा उल्लेख मॅन ऑफ द इयर असा केला होता.मॅगझिन कव्हरवर गांधीजी होते. नंतर 1931 मध्येही गांधीजींचा मॅगझिन कव्हरवर सेंट अर्थात संत गांधी असा उल्लेख आणि पह्टो टाईमने प्रसिद्ध केला होता.

हेही वाचा :

सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले; शिवप्रतिष्ठान संघटना आक्रमक

‘आदित्य ठाकरेंचा हट्ट अन् मला मुख्यमंत्रीपद मिळालं’; फडणवीसांचा गौप्यस्फोट!

रोहित शर्मा आज मुंबईसाठी खेळणार शेवटचा सामना? Video Viral