संजय राऊतांना दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर, शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती

मुंबई: भाजपचे माजी खासदार (current political news)किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात शिवडी कोर्टाने त्यानं दोषी ठरवले होते. कोर्टाने संजय राऊतांना १५ दिवसांची कोठडी व २५ हजारांचा दंड देखील ठोठावला होता. शिक्षा सुनावली गेल्यानंतर संजय राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र नायायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर केला आहे. मेधा सोमय्यांनी २०२२ मध्ये संजय राऊतांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

शिवडी कोर्टाने राऊतांना(current political news) शिक्षा सुनावल्यानंतर राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली व अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर याचिकेवर झालेल्या सुनावणीत राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पुढील ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात दाद मागण्याची मुभादेखील सत्र न्यायालयाने दिली आहे.

मीरा भाईंदरमधील टॉयलेट घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने राखून ठेवला होता.

या निकालाची आज (26 सप्टेंबर) सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. हा संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र आता सत्र न्यायालयाने राऊतांना जामीन दिला आहे.

मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

संजय राऊत यांना यापूर्वीच बदनामी आणि मानहानीची नोटीस बजावण्यात आली असून मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी एक रुपयाचा घोटाळा केला आहे आणि केवळ भीतीपोटी, त्यांची बदनामी करण्यासाठी एक रुपयाच्या घोटाळ्याचे पुरावे/कागदपत्रे नष्ट केली आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

हेही वाचा:

BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या

‘मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, पक्ष तोडण्याची गरज नव्हती…’ , सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

‘येक नंबर’ चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?