‘तू बेहरा आहेस का..’ Live मॅचमध्ये ऋषभ पंत अंपायरशी भांडला, पुढच्या मॅचवर बंदी

आयपीएलमध्ये अखरे दिल्ली कॅपिटल्सने(umpire)आपला पहिला विजय मिळवला. लखनऊ सुपर जायंट्स वर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला खरा पण हा मॅच दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंताच्या त्या कृतीमुळे चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. पण ऋषभ पंतने लाइव्ह मॅचमध्ये अंपायरशी घातलेल्या वादामुळे अडचणीत सापडला आहे.

एवढंच नाही तर ऋषभ पंतने अंपायरशी(umpire) केलेले भांडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर ऋषभ पंत सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. पंतच्या या कृतीची शिक्षा म्हणून पुढच्या मॅचमध्ये त्याला बंदी घालण्यात येईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

झालं असं की, दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने क्विंटन डी कॉकला एलबीडब्ल्यू आऊट करुन संघासाठी पहिलं यश मिळवलं. अहमदनंतर इशांत शर्माला बॉलिंग देण्यात आली. देवदत्त पडिक्कल त्यावेळी स्ट्राइकवर होता. इशांतने बॉल टाकला आणि अंपायरने तो वाईड असल्याच सांगितलं. त्यानंतर ऋषभ पंतने संघाच्या खेळाडूंशी एकत्र बोलत असताना त्याने असे हातवारे केले की, मैदानावरील पंचांना वाटले की तो डीआरएस मागत आहे. यानंतर मैदानावरील पंचांनी ताबडतोब तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू मागितला.

या घटनेनंतर ऋषभ पंत बराच वेळ मैदानावरील अंपायशी वाद घालताना दिसला. ऋषभ पंतने अंपायला जाब विचारला की, मी रिव्ह्यू मागितला नव्हता, मग तुम्ही कोणत्या आधारावर निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला?

https://twitter.com/i/status/1778790705667740039

त्यानंतर रिप्ले पाहिल्यावर ऋषभ पंतने रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिल्याचे स्पष्टपणे दिसल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. पण अंपायरऐवजी ऋषभ पंत कोणत्या तरी खेळाडूला हे संकेत देत असल्याच काही लोकांचं आणि पंतच म्हण आहे. पण कोणत्याही खेळाडूला सांगण्याची ही पद्धत ऋषभ पंतवर महागात पडली आणि सोबतच दिल्लीने एक रिव्ह्यू गमावला.

हेही वाचा :

मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता!

टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट अन् रोहित करणार ओपन; निवडसमिती अन् बीसीसीआनेही…

महाडिक अन् मंडलिकांना ‘ती’ वक्तव्य भोवणार? महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार