इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विजयाच्या ट्रॅकवर(driver) परतल्याने संघातील खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला आहे. आता या संघाचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.
आयपीएलमधील मुंबई आणि चेन्नई(driver) यांच्यातील सामना एल क्लासिको म्हणूनही ओळखला जातो. स्पर्धेच्या या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ बसने त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा रोहित शर्माने चक्क वाहकाची जबाबदारी घेतली. टीम मेंबर्स बसमधून उतरत असताना रोहितने ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन स्टेअरिंग ताब्यात घेतलं.
रोहित शर्माची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. यादरम्यान रोहितने त्याच्या फोनमधून व्हिडिओ आणि फोटोही काढले. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते मजेशीर कमेंट्सही लिहित आहेत.
रोहित शर्मा आयपीएलच्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचे कर्णधार नाही. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची कमान सोपवण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता आणि मुंबईच्या सामन्यात हार्दिक पांड्यालाही बडवण्यात आलं होतं, पण आता टीम आपल्या लयीत आल्यानं मुंबई कॅम्पमध्ये सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं दिसत आहे.
रोहित शर्मा या लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले. मुंबई व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्स हा एकमेव संघ आहे ज्याने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. अशा परिस्थितीत आता हार्दिककडूनही रोहितप्रमाणे संघाला भरघोस यश मिळावे, अशी अपेक्षा आहे.
संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव घेऊन रोहितने हार्दिकला मैदानावर चांगली साथ दिली आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने त्यांच्या आयपीएल 2024 च्या मोहिमेला सलग तीन पराभवांसह सुरुवात केली परंतु नंतर परत दोन विजयांची नोंद केली. रोहित, जो या महिन्याच्या शेवटी 37 वर्षांचा होणार आहे, त्याने खुलासा केला की त्याला भारतीय क्रिकेट संघासाठी काही वर्षे खेळायचे आहे. ” मी सध्या चांगला खेळत आहे आणि आणखी काही वर्षे खेळत राहण्याचा विचार करत आहे.
मला तो विश्वचषक जिंकायचा आहे. 50 षटकांचा विश्वचषक हा खरा विश्वचषक आहे. आम्ही 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठे झालो आहोत. 2025 मध्ये लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होणार आहे. आशा आहे की, आम्ही तिथे पोहोचू,” रोहितने YouTube चॅट शो – ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्समध्ये ही माहिती दिली.
हेही वाचा :
६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
मोदी की गॅरंटी! जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा कोणत्या?
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’