भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर मालिकेचा चौथा सामना २६ डिसेंबरपासून सुरु झाला आहे. आज या सामन्याचा दुसरा दिन सुरु आहे(Rohit Sharma). यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ४७४ धावा केल्या आहेत, सुरुवातीपासूनच कांगारूंच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला.
ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतक ठोकली तर स्टीव्ह स्मिथने संघासाठी शतक ठोकलं आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांचा सुरुवातीला ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी घाम गाळला होता. आता भारताचा संघ फलंदाजीसाठी आला आहे, यामध्ये टीम इंडियाने २ विकेट्स गमावले आहेत. या सामन्यादरम्यान दुसऱ्या दिनाचा एक व्हिडीओ कॅप्टन रोहित शर्माचा(Rohit Sharma) सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे यावर एकदा नजर टाका.
जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्टंपच्या आसपास असतो तेव्हा लोकांना त्याचे शब्द नेहमीच आवडतात. तो ज्या भाषेत सल्ला देतो किंवा सहकारी खेळाडूंना कोणतीही तक्रार करतो ती भाषा आणि शैली चाहत्यांना आवडते.
बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशीही असंच काहीसं पाहायला मिळालं, तेव्हा रोहित शर्माने रवींद्र जडेजाला विचारलं की, मग त्याला कोण बाद करणार? जडेजाला वेगळी फिल्डिंग हवी होती, पण कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ती लांबलचक चौकार होऊ शकतो आणि फटकेबाजी करताना तो त्याची विकेट मिळवू शकतो.
अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या एका ओव्हरपूर्वी रोहित शर्मा म्हणतो, “यार, चेंडू तिकडे जाणार नाही.” तो पुढे म्हणतो, “तो बाहेर असेल. बाउंड्री खूप लांब आहे यार. त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे बघावे लागेल, यार. मग त्याला कोण बाहेर काढेल, मला? मला पुन्हा बॉल टाकावा लागेल.” मेलबर्न येथील एमसीजी येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी चांगला गेला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात ब-याच धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रात तीन विकेट घेतल्या, पण यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला तेव्हा रोहित शर्मा लवकर बाद झाला.
या सामन्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरला, कारण ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमावून ४७४ धावा केल्या होत्या.
Absolutely hilarious! @ImRo45's latest stump mic moment is pure gold! Don’t miss it! #AUSvINDOnStar 4th Test, Day 2 LIVE NOW! | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/R1BQmbtFNc
— Star Sports (@StarSportsIndia) December 27, 2024
ऑस्ट्रेलियन संघासाठी स्टीव्ह स्मिथने दमदार शतक झळकावले, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशने यांनी अर्धशतके झळकावली. कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावा केल्या. भारतासाठी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह होता, ज्याने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. रवींद्र जडेजाने ३ आणि आकाश दीपने २ विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरला एक यश मिळाले.
हेही वाचा :
आज ‘या’ 6 राशीच्या व्यक्ती मालामाल होणार!
चार पेगहून अधिक मिळणार नाही दारू, काय आहेत 31 डिसेंबरचे नियम?
आजपासून 2 जानेवारीपर्यंत देशात ‘राष्ट्रीय दुखवटा’! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?