रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधूनही घेतली निवृत्ती?

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा(Rohit Sharma) याने आधीच टेस्ट आणि टी20 क्रिकेटला अलविदा केले आहे. आणि आता सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की त्याने वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे.

खरंतर, रोहित शर्माने(Rohit Sharma) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, जो त्याच्या एकदिवसीय निवृत्तीशी जोडला जात आहे. हा फोटो व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर लोक असा दावा करत आहेत की ‘हिटमन’ ने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीलाही निरोप दिला आहे. मात्र, या दाव्यांमागे खरे काय आहे? चला जाणून घेऊया.

वायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
रोहित शर्माने 23 जून 2025 रोजी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याचं हेल्मेट आहे आणि त्यावर त्याने “भारताचं प्रतिनिधित्व करणं नेहमीच अभिमानाचं असेल.” असे एक कॅप्शन दिले आहे. हे वाक्य आणि तारीख पाहून सोशल मीडियावर अनेकांनी अंदाज लावला की रोहितने आपली वनडे कारकीर्द संपवली आहे. काहींनी तर थेट पोस्ट शेअर करून त्याच्या निवृत्तीची बातमी पसरवायला सुरुवात केली.

रोहितने हा फोटो शेअर केला असला तरी त्यात कुठेही स्पष्टपणे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं लिहिलेलं नाही. त्याचप्रमाणे, BCCI कडूनसुद्धा यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणून, सोशल मीडियावर रोहितच्या निवृत्तीबाबत होत असलेले दावे खोटे आहेत.

सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma)फक्त वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तो पुढचा सामना ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेत खेळू शकतो. याच वर्षात भारताची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धसुद्धा तीन-तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. जर रोहित सर्व सामने खेळतो, तर 2025 च्या अखेरीपर्यंत तो एकूण 9 वनडे सामने खेळू शकतो.

रोहित शर्माची कारकीर्द
एकूण वनडे सामने: 273

एकूण धावा: 11,168

वनडेतील सर्वाधिक वैयक्तिक धावा (264) करणारा एकमेव फलंदाज

शतके: 32, अर्धशतके: 58
सध्या तरी रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. सोशल मीडियावर फिरत असलेली माहिती अफवा आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! 1 जुलैपासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; NPS आणि UPS योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन