२०२४ हे वर्ष खऱ्या अर्थाने सई ताम्हणकरसाठी(bollywood film) खास ठरतंय असं म्हटलं वावगं ठरणार नाही. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच अभिनेत्रीच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरू आहे. “श्री देवी प्रसन्न”, “भक्षक”, “डब्बा कार्टेल” आणि “ग्राऊंड झिरो” या प्रोजेक्टनंतर लवकरच ती आणखी एका नव्या प्रोजेक्टमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सईने “ग्राऊंड झिरो” आणि “अग्नी” अशा दोन प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. “आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिना”निमित्त सईने “अग्नी”चं पोस्टर शेअर केलं आहे.
२०२४ हे वर्ष सईसाठी बॉलिवुडमय(bollywood film) ठरतंय यात शंका नाही. “भक्षक” या हिंदी वेब शोनंतर आता सई “अग्नी” साठी सज्ज होत आहे. प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, दिवेंद्यू, सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट असलेला “अग्नी” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतीक गांधी या बड्या कलाकारांसोबत सई या आगामी “अग्नी” चित्रपट मध्ये दिसणार असून तिच्यासाठी हा प्रोजेक्ट खास आहे असं ती सांगते. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा हा चित्रपट आहे.
सईसाठी हा प्रोजेक्ट खूपच खास असणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्टबद्दल ती म्हणाली की, “एक्सेल एंटरटेनमेंटसारख्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. अग्नी प्रोजेक्ट माझ्यासाठी खूपच खास आहे.
तगड्या स्टारकास्टसोबत काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. आज “आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिवशी” “अग्नी” चित्रपटाचं पोस्टर शेयर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. हा चित्रपट खूप वेगळा असणार असून तो नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देऊन जाणार आहे.”
‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या व्यतिरिक्त सई ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ‘डब्बा कार्टेल’ रिलीज होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत आज तिनही उमेदवारांकडून पदयात्रा
मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी
शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर