सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम भिकाऱ्यांच्या गराड्यात अडकला… Video Viral

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान नेहमीच काही ना काही कारणास्तव सोशल मीडियावर चर्चेत असतो. पॅपराझींचा तो आवडता स्टार किड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. (beggars)दरम्यान नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत इब्राहिम अली खान भिकाऱ्यांच्या(beggars) गराड्यात अडकलेला दिसत आहे. यावेळी भिकारी त्याच्याकडे पैशांची मागणी करत आहेत. यावेळी इब्राहिम अली खानला बोलतना पाहून तुम्हाला तरुणपणातील सैफ अली खानची आठवण येईल. अखेरीस इब्राहिम अली खान ‘जय श्रीराम’चा नारा देत तिथून निघून जातो.

इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ इब्राहिम अली खानने काळ्या रंगाची शॉर्ट्स आणि सफेद रंगाचं जॅकेट घातलेलं दिसत आहे. यावेळी कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेला होता. यावेळी त्याला सर्व बाजूंनी भिकाऱ्यांनी घेरलं होतं. ते सर्वजण त्याच्याकडे पैसे मागत होते.

यावेळी त्यांच्यातील एकजण म्हणतो, “5 रुपयांनी आमचं काय होणार साहेब?”. त्यावर इब्राहिम अली खान म्हणतो, काय यार आता? 5 रुपयांनी काही होणार नाही, पण झालंही पाहिजे ना. यावेळी तो समोरच्या व्यक्तीला माझ्या वडिलांना फोन लाव सांगतो. यानंतर अखेरीस तो जय श्रीरामचा नारा देतो आणि निघून जातो. निघून जाण्याआधी तिथे उपस्थित एका महिलेशी हस्तांदोलन करतो.

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरी त्यावर व्यक्त झाले आहेत. अनेकांनी इब्राहिम अली खानचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, याचा आवाज अगदी आपल्या वडिलांसारखाच आहे. तर दुसऱ्याने हा फार प्रेमळ आहे यात काही वाद नसल्याचं म्हटलं आहे. तिसऱ्याने लिहिलं आहे की, काहीही असो पण हा एकदम बिनधास्त आहे. किमान शाहरुख खानच्या मुलासारखा नाही ज्याच्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नसतं. बघावं तेव्हा अत्यंत रुड असतो. हा त्यामानाने जबरदस्त आहे आणि स्वत:हून जय श्रीराम बोलत आहे.

दरम्यान इब्राहिम अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे,. इब्राहिम अली खान सरजमीन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात काजोलही दिसणार आहे.

हेही वाचा :

CM देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप

इचलकरंजी : पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था; धोकादायक वळणावर ट्रक पलटी

‘हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,’ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला… Video Viral