सॅमसंग गॅलेक्सी M16 आणि M06 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगच्या नवीन (price)गॅलेक्सी एम सीरिजमधील स्मार्टफोनच्या लाँचबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर सॅमसंग गॅलेक्सी M16 आणि गॅलेक्सी M06 5G M06 5G स्मार्टफोन आज, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात लाँच झाले आहेत.भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन्सनी आधीच खूप लोकप्रियता मिळवली आहे. आता कंपनीने आणखी दोन नवीन उपकरणे सादर केली आहेत. हे स्मार्टफोन अनेक उत्कृष्ट फीचर्ससह लाँच झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया सॅमसंग गॅलेक्सी M16 आणि गॅलेक्सी M06 5Gची किंमत आणि खास वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलेक्सी M16 5G फोन ११,४९९ रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरिएंटची आहे. या स्मार्टफोनची विक्री ५ मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. तर दुसरीकडे, सॅमसंग गॅलेक्सी M06 5G स्मार्टफोन ९,४९९ रुपयांच्या विशेष लाँच किमतीत सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजव्हेरिएंटची ही किंमत असेल. या फोनची विक्री ७ मार्च २०२५ पासून ॲमेझॉनवर सुरू होईल.सॅमसंग गॅलेक्सी M16 5G स्मार्टफोनमध्ये (price)६.७ इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ९०Hz आहे. तर, गॅलेक्सी M06 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ९०Hz आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M16 5G फोनमध्ये डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, गॅलेक्सी M06 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० एसओसी प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित वन यूआय ७.० वर चालतो.सॅमसंग गॅलेक्सी M16 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ५०MP चा मुख्य कॅमेरा, ५MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरआणि २MP चा डेप्थ लेन्स आहे. तसेच, सेल्फीसाठी यात १३MP चा कॅमेरा आहे. तर, दुसऱ्या गॅलेक्सी M06 5G स्मार्टफोनमध्ये दोन (price)रिअर कॅमेरा सेटअप आहेत. यात ५०MP चा मुख्य आणि २MP चा डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी यात ८MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M16 5Gफोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आहे. त्याचबरोबर, गॅलेक्सी M06 5G फोनमध्ये ऊर्जा देण्यासाठी ५०००mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगलासपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी डिव्हाइसमध्ये 5G, ड्युअल-बँड वाय-फाय एसी ब्लूटूथ ५.३, जीपीएस आणि ३.५mm हेडफोन जॅक आहे.

हेही वाचा :

राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

महागाईमुळे त्रस्त लोकांसाठी आनंदाची बातमी; पेट्रोलच्या किंमतीत घट

गटारात मेथी भाजी धुणाऱ्या भाजीवाल्याचा Video समोर