सांगलीचा रँचो! दहावीच्या मुलाने बनवली “ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’

सांगलीतील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीने एक असे तंत्र विकसित केले आहे.(built)ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना लगाम बसणार आहे. त्यामुळे दारूच्या नशेत गाडी चालल्याने होणारे अपघात टाळले जातील,असा दावा सांगलीच्या प्रेम पसारे याने केला आहे. सांगलीच्या रँचोने बनवलेल्या “ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम”चा अनेकांना फायदा होणार आहे.

नशेत वाहन चालविल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला. तेव्हा त्याला ‘(built)आयडिया’ सुचली. दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ बनवली.मोटारचालकाने नशेत इंजिन सुरू केले तर तत्काळ मालकाला मोबाइलवर ‘व्हॉईस कॉल’ जाईल.‘आपके कार का चालक नशेमे है’ असे ऐकवून ‘लोकेशन’ देखील पाठवले जाईल,तसेच इकडे मोटारीचे इंजिनदेखील बंद पडेल,अशी सिस्टीम दहावीत शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याने बनवली आहे.

प्रेमचे वडील हे शहरात चहा विक्रीचा व्यवसाय करतात,प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल आहे.वेगवेगळ्या कल्पना प्रेमच्या डोक्यात भिरभिरत असायच्या,एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालविल्यामुळे गाडी झाडावर आदळून झालेला अपघात पाहिला,तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे? असे विचारचक्र सुरू झाले,चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही, अशी सिस्टीम तयार करण्याविषयी प्रयत्न करू लागला.

यातून दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर प्रेम याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ बनवली.(built)त्याच्या ही सिस्टीम सेन्सर आधारित आहे. तर चालकाने नशेत असताना गाडी सुरू केली तर तत्काळ मालकाच्या मोबाइलवर एक व्हॉईस कॉल,गाडीचा क्रमांक,इंजिन,चेस नंबर आणि लोकेशन आदी माहितीबरोबर गाडीचा मालकाला जाते. शिवाय गाडीचे इंजिन बंद होते. अशी सिस्टीम बनवल्याचा दावा प्रेमने केला आहे.प्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे पंधरा हजारांपर्यंत खर्च येतो.तसेच यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी मोबाइलवर ॲप आवश्यक असते.परंतु त्यामुळे अपघात टळून लाखमोलाचा जीव वाचू शकतो,या सिस्टीमच्या पेटंटसाठी प्रेमच्या वडिलांनी प्रस्ताव पाठवला आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात आता कृषी समृद्धी योजना सुरू

आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात माठी घसरण, चांदीचे भाव स्थिर!

अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले!