सांगली हादरले! पाठलाग करत भररस्त्यात केली हत्या; मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार

सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड वरील वाल्मिकी आवासमध्ये(record)पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत धारदार हत्याराने डोक्यावर, गेल्यावर आणि हातावर वार करून निर्घृण खून केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.सांगलीतील वाल्मिक आवास येथील रहिवासी असलेला सौरभ बापू कांबळे वय २४ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान सौरभ याचा काही दिवसांपूर्वी वाल्मिकी आवास मधल्या तरुणांसोबत घोडागाडी पळवण्याच्या कारणातून वाद झाला होता. या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात दिवसाआड होणाऱ्या खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सौरभ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (record)तर त्याचा भाऊ देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या तो कळंबा कारागृहात आहे. तर हत्येच्या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास करत मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरामध्ये सध्या डाळिंब चोऱ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरटे बागांमधून तयार झालेले डाळिंब वाहनांमध्ये भरून पसार होत आहेत. (record)शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास चोरटे डल्ला मारीत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. परिसरातील तीन शेतकऱ्यांचा मिळून साधारणपणे १२ लाख रुपयांचा डाळिंब शेतीमाल चोरून अज्ञात चोरटे पसार झाले.

हेही वाचा :

चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?

पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral