मासिक पाळी तपासण्यासाठी शाळेत विद्यार्थिनींना केलं विवस्त्र; पालकांचा संताप

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींची(students) मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने त्यांना विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच शिक्षिका, दोन महिला कर्मचारी, एका शिपायाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास ३००च्या अधिक मुली शिक्षण घेत आहेत. ८ जुलैला सकाळी १० ते १२ च्या सुमारास मुख्याध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यांनतर शाळेलतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरूमच्या काडीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले.

यानंतर विद्यार्थिनींना(students) मासिक पाळी आले आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली. त्यांनतर ज्या मुलींना मासिक पाळी आलेली आहे. त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास ५ शिक्षकांना सांगितले. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरूमध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले.

या धोक्कादायक घटनेची माहिती पालकांना समजताच आज पालकांनी ( 9 जुलै रोजी ) शाळा गाठत मुलींसोबत या घडलेल्या प्रकारचा जाब विचारला आणि गोंधळ घातला. त्याचबरोबर इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप पालकांनी केला दमाणी स्कूलमधील मुख्यध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली.

याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावेळी पीडित मुलींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र आले. पोलिसांनी भा.न्या. संहिता कलम 74, 76 सह कलम 11, 12, 29 पोक्सो अन्वये मुख्यध्यापिकेसह 5 शिक्षिका व शाळा प्रशासन व्यस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापिकेला कामावरून कमी करण्यात आल्याचं शाळा प्रशासनाने म्हंटल आहे.

हेही वाचा :

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान आली दुःखद बातमी

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी