देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुर्गम भागांना हवाई सेवेने जोडण्याच्या (glacier express)उद्देशाने देशभरातील १५० मार्गांवर सागरी विमान सेवा सुरू करण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून राज्यात लवकरच आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुर्गम भागांना हवाई (glacier express) संपर्काने जोडण्याच्या उद्देशाने देशभरातील १५० मार्गांवर सागरी विमान सेवा सुरू करण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील आठ ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान ५.५’ योजनेत हेलिकॉप्टर आणि सागरी विमान सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
कोणत्या राज्यात सुरू होणार?
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरुवातीच्या टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सागरी विमान सेवांसाठी निवडले आहेत. (glacier express)या ठिकाणांच्या जलाशयांमधून, नद्यांमधून आणि बॅकवॉटरमधून हवाई वाहतूक पुरवली जाईल. या प्रकल्पासाठी कॅनडाच्या ‘डी हॅव्हिलँड एअरक्राफ्ट’ कंपनीचे विमान वापरले जाईल.
राज्यात ठिकाणी ‘सी प्लेन’ सेवा होणार सुरु
धोम धरण (वाई, सातारा)
गंगापूर धरण (नाशिक)
खिंडसी धरण (नागपूर)
कोराडी धरण (मेहकर, बुलढाणा)
पवना धरण (पवनानगर, पुणे)
पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)
गणपतीपुळे (रत्नागिरी)
रत्नागिरी (रत्नागिरी)
इंडिगो आणि पवन हंस सारख्या कंपन्या देशात समुद्री विमान सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. या ‘सी प्लेन’च्या तिकिटाची किंमत दीड ते दोन हजार रुपये असू शकते. उडान योजनेअंतर्गत या सेवांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल. नागरी विमान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा देशभरात विस्तारली जाईल.
युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका…; राज ठाकरेंच्या विधानाने खळबळ
२०१४ मध्ये नाशिकमध्ये सी प्लेनची चाचणी
२०१४ मध्ये छगन भुजबळ पालकमंत्री असताना, नाशिकमधील गंगापूर धरणावर सी प्लेनची चाचणी घेण्यात आली होती. गंगापूर धरण नाशिक शहराला पिण्याचे पाणी पुरवते आणि ते मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे घर देखील आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी गंगापूर धरणावर या सेवेला विरोध केला. त्यावेळी, गंगापूरऐवजी आळंदी किंवा नाशिकजवळील वालदेवी धरणातून ही सेवा सुरू करण्याचा पर्याय सुचवण्यात आला होता. आता केंद्रीय योजनेत गंगापूर धरणाचा समावेश करण्यात आल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं