“आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।”; लातूरच्या शेतकऱ्याला सोनू सूदचा मदतीचा हात

सध्या सोशल मीडियावर लातूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.(social) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपे (Latur Farmer) शेतात नांगरताना दिसत आहे. त्यांच्याकडे बैल नसल्यामुळे वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. या वृद्ध जोडप्याची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट असल्यामुळे त्यांना असे करावे लागत आहे. या व्हिडीओ पाहताच बॉलिवूड मधून एका अभिनेत्याने मदतीचा हात पुढे केला आहे.

बॉलिवूडचा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सोनू सूद (Sonu Sood) आहे.(social) हा व्हिडीओ पाहून सोनू सूदने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करून त्यावर लिहिलं की, “आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।” सोनू सूदच्या या कृतीने साऱ्यांचे मन भारावून गेले आहे. सोनू सूद कायम गरजूंना मदत करताना पुढे असतो.

वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ पाहून स्थानिक प्रशासन देखील(social) सक्रिय झाले आणि मदतीसाठी वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी यांनी देखील या जोडप्याला मदत केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी वृद्ध जोडप्याची भेट घेतली आहे. त्यांना कृषी विभागात सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितले आणि लवकरच ती उपकरणे त्यांना पुरवली जाणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?
लातूर जिल्ह्यातील 65 वर्षीय अंबादास पवार आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांच्याकडे बैल खरेदी करायला देखील पैसे नाही आहे. म्हणून वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. हे जोडपे लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील रहिवासी आहेत. त्यांनी सरकारकडे कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. ते अडीच एकर कोरडवाहू जमिनीचे ते मालक आहेत. खतांचा खर्च, ट्रॅक्टर, बैल परवडत नसल्यामुळे हे जोडपे शेतात राबतात.

हेही वाचा :

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!

‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ