शहरातील देवपूर भागातील महिलेवर (Woman)एकाने अत्याचार केले. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली. तर चार दिवसांपूर्वी पाठलाग करत मारहाण देखील केली. याप्रकरणी बुधवारी संशयित आरोपीवर देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
देवपुरातील गॅलेक्सी पार्क परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने (Woman)दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजेदरम्यान रोहन शशिकांत गुरव (वय २९, रा.ह.मु. फॉरेस्ट कॉलनी, देवपूर व गल्ली नं. ११, जुने धुळे) याने तिचा पाठलाग करुन रस्त्यावर थांबवून ‘तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव’, असा आग्रह केला. त्यानंतर साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी ही विटाभट्टी येथील कदमबांडे दवाखान्यात टेबलावर बसलेली असताना रोहन याने दवाखान्यात येत ‘तू माझ्याशी प्रेमसंबंध न ठेवता तुझ्या खुर्चीच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी तुझे प्रेमसंबंध आहेत’, असे बोलून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच चापट मारुन पँटच्या खिशातून लहान चाकू काढून जोरात टेबलावर आपटला. त्यामुळे तोच चाकू रोहन याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून तो जखमी झाला. तसेच रोहन याने वेळोवेळी खंडणी स्वरूपात २ लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून 20 लाखाची मागणी केली. त्यावरून रोहन गुरव यांच्या विरोधात दाखल करण्यात आला.
‘माझ्या अंगात देव येतो’, असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणी करून महिलेवर प्रभाव पाडला.
दिल्लीतील कॉलनीतील एका विद्यार्थ्याने लोणी येथील ताहेरे भागातील अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने लैंगिक अत्याचाराचा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अत्याचारानंतर विद्यार्थिनीने दिल्लीतील रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून अहवाल दाखल केला. घटनास्थळ लोणी येथे असल्याने पीडितेला स्थलांतरित करण्यात आले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचे वय निश्चित करून पोलीस पुढील कारवाई करतील.
हेही वाचा :
स्कूल बस पलटी: १८ विद्यार्थी घायल, थरारक… Video Viral
नाराज भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही; प्रवेशाला ‘ब्रेक’ लागण्याचं कारणही समोर
टीव्ही रिचार्ज दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; ‘फ्री टू एअर डीटीएच’ची मागणी वाढली!