‘गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम’, चाहत्यांचा संताप अनावर! 

भारत आणि बांगलादेशच्या संघादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु असतानाच टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ(team india) शनिवारी रात्री जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघामधून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडबरोबरच घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या इशान किशनलाही संघातून वगळण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही वगळण्यात आलं.

मात्र या साऱ्यांमध्ये ऋतुराजची कामगिरी आणि आकडेवारी त्याच्या बाजूने असतानाही त्याला संघात स्थान का नाही असा जाब आता त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे. टी-20 च्या संघामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीरचा प्रभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघांतील खेळाडूंची संख्याही बऱ्यापैकी दिसत असल्याने दुजाभाव केला जात असल्याच मतंही चाहत्यांनी व्यक्त केलं आहे.

भारत आणि बांगलादेशदरम्यान 6 ऑक्टोबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठीच भारतीय संघाची(team india) घोषणा करण्यात आली. या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. संघातील सर्वात नव्या चेहऱ्याबद्दल बोलायचं झालं तर हैदराबादच्या संघाकडून खेळताना आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करताना नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या खेळाडूला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. नितीश कुमार रेड्डीबरोबर मयंक यादवलाही संघात स्थान देण्यात आलं असतानाच अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना वगळण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मयांक यादवला संधी मिळण्यामागेही आयपीएल 2024 मध्ये त्याने केलेली कामगिरीच कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.

लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या मयंकने ताशी 150 किमी प्रति तासहून अधिक वेगाने चेंडू टाकला होता. मयांक यादवने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. मात्र ऐन फॉर्मात असताना दुखापतीमुळे तो आयपीएलचं पर्व अर्धवट सोडून गेला. तो दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर होता, पण त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर आणि अनोख्या शैलीमुळे भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच्या आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे संघ निवडण्यात आला असताना सध्या घरगुती स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे का असा सवाल चाहत्यांनी विचारला आहे.

अनेक उत्तम खेळाडूंना बीसीसीआयने नाकारलं आहे असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने ‘बीसीसीआय आणि गौतम गंभीरला ऋतुराज गायकवाडबरोबर काही खासगी अडचण आहे असं वाटतंय. बीसीसीआय कडून त्याला डावललं जात आहे. तो आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज आहे,’ असं स्क्रीनशॉट पोस्ट करत म्हटलं आहे. दुसऱ्याने, संघात शुभमन गिल नाही, यशस्वी जयसवाल नाही तरीही ऋतुराजला संघात स्थान दिलं नाही असं म्हटलं आहे.

एकाने तर ऋतुराजच्या टी-20 कामगिरीची आकडेवारी मांडत एवढं असतानाही त्याला संघात स्थान नाही असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. अन्य एकाने श्रेयस अय्यर आणि ऋतुराजला अजून एक संधी दिली पाहिजे असं म्हटलं.

बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव.

हेही वाचा:

भाजपचं मोठं नुकसान, शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश…

‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, अचानक धनलाभ होऊ शकतो

भारत सरकारचा एक निर्णय… अन् जगभरातील देशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास