लज्जास्पद! धावत्या रुग्णवाहिकेत बेशुद्ध पडलेल्या तरुणीवर बलात्कार

बिहारच्या गया जिल्ह्यातून एक लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. बोधगया पोलीस स्टेशन परिसरातील बीएमपी-३ परेड ग्राउंडवर होमगार्ड भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका तरुणीवर रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका(ambulance) चालक आणि तंत्रज्ञांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 24 जुलैला घडली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जुलै रोजी घडली, जेव्हा होमगार्ड भरतीवेळी धावत असताना एक तरुणी बेशुद्ध पडली. त्याचवेळी तरुणीला घटनास्थळी उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत(ambulance) रुग्णालयात नेण्यात येत होते. याचदरम्यान रुग्णवाहिकेत चालक आणि टेक्निशियनने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला उमेदवाराने पोलिसांना हल्ल्याची तक्रार केली. तिच्या तक्रारीच्या आधारे, रुग्णवाहिका चालक विनय कुमार आणि तंत्रज्ञ अजित कुमार यांना दोन तासांत अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोधगया एसडीपीओ सौरभ जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. पुरावे गोळा करण्यासाठी एक फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींची ओळख पटवण्यात मदत झाली. बोधगया पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. तपास लवकरच पूर्ण होईल, लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल आणि दोन्ही आरोपींविरुद्ध जलद खटला आणि कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

या प्रकरणी बोधग या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक आनंद कुमार यांनी सांगितलं की, ‘तपास लवकर पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्यात येईल आणि आरोपींवर फास्ट-ट्रॅक कोर्टाद्वारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.’

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. येथील इंदिरा नगर येथील एका प्रतिष्ठित शाळेच्या व्हॅन चालकाने गाडीतच चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने तिला मारहाणही केली. मुलीने तिच्या आईला सर्व काही सांगितले. अशा परिस्थितीत, आई तक्रार घेऊन शाळेत पोहोचली.

मुलीची आई तक्रार करण्यासाठी पोहोचली तेव्हा आरोपी व्हॅन चालक मोहम्मद आरिफने त्यांना धमकी दिली. तसेच, शाळेच्या व्यवस्थापकाने तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही. अशा परिस्थितीत मुलीच्या आईने इंदिरानगर पोलिस ठाण्यात आरिफ आणि शाळेचे व्यवस्थापक संदीप कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली.

हेही वाचा :

काँग्रेसचा मोठा नेता भाजपाच्या वाटेवर? ‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणेचा जनकच शिंदेंना साथ देणार?

लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी!