शामी आणि सानिया मिर्झाच्या नव्या लूकने सोशल मीडियावर केला कहर!

मोहम्मद शामी-सानिया मिर्झा : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी(social media) सध्या मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तो तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. लवकर मोहम्मद शामी हा भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याचे वृत्त समोर आले आहेत.

परंतु मागील काही काळांपासून मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झा(social media) यांचे नाव जोडले जात होते. सानिया मिर्झा हीच घटस्फोट झाला आहे. यासंदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच त्याचा नवा लूक उघड केला आहे. शमीच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजाने काही काळापूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केले होते, त्यानंतर त्याच्या केसांमध्ये एक वेगळीच चमक दिसली. दरम्यान, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानेही तिच्या सोशल मीडियाद्वारे एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सानिया मिर्झाचा फोटो पाहून चाहते स्वत:ला थांबवू शकले नाहीत. सानिया मिर्झा पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.

सानिया मिर्झाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला मोहम्मद शमीसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. एका यूजरने गंमतीत लिहिले की, मोहम्मद शमीशी लग्न कर आता त्याचे केस वाढले आहेत. याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, “शमी भाई सुद्धा सुंदर दिसत आहे, मॅडम, आता समजून घ्या.” अशा प्रकारे लोकांनी सानिया मिर्झाच्या पोस्टवर अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या.

सानिया मिर्झाने जानेवारीमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला होता. तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर मलिकने सानिया मिर्झाशी फारकत घेतली. तेव्हापासून मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता. उल्लेखनीय आहे की भारतीय वेगवान गोलंदाजाची पत्नी हसीन जहाँ त्याच्यापासून वेगळी राहते. अशा परिस्थितीत त्यांच्या लग्नाच्या अफवांना जोर आला होता. मात्र, शमीने या अफवांना पूर्णविराम मुलाखतीमध्ये दिला होता आणि ट्रॉलर्सला खडसावले देखील होते.

हेही वाचा:

कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली…

सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी

भाजप आमदाराच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक;, 2 जण जागीच ठार