नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना धक्का

नवीन वर्षाचा पहिलाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष(political news) आणि नाईक कुटुंबासाठी दुःखाचा ठरला आहे. कारण शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवली. आज, बुधवार एक जानेवारी २०२५ रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास प्रदीप नाईक यांचे निधन झाले. हैदराबाद येथे ही दुःखद घटना घडली आहे.3

प्रदीप नाईक हे शरद पवार(political news) यांचे विश्वासू मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. पराभवाचा त्यांना चांगलाच धक्का बसला होता.

प्रदीप नाईक हे सलग तीन टर्म आमदार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदीप नाईक प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

हेही वाचा :

…तर नववर्षाची रात्र ‘लॉकअप’मध्येच घालवावी लागणार; पोलिसांनी कसली कंबर

वर्षाचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी ठरणार खास; 31 डिसेंबरपासून नशीब उजळणार

शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचे नवे पोस्टर लवकरच होणार रिलीज?