बारामतीच्या कन्हेरीतून पवार कुटुंबीय(political news) प्रचाराचा शुभारंभ करत असतात. या परंपरेप्रमाणे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची पहिली सभा कन्हेरीत होत आहे. या सभेला बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार(political news) यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. याचीच नक्कल शरद पवारांनी आजच्या सभेत केली आहे. शरद पवारांनी चष्मा काढला, रुमालाने डोळे पुसले. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बारामतीमधील पहिल्याच सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
मी गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक तालुके पालथे घातले आहेत. कारण मला महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. राज्याची सत्ता सामान्यांच्या हाती द्यायची आहे. ते करायचं असेल तर तुम्ही-आम्ही एकजुटीने आपली शक्ती उभी केली पाहिजे, असं शरद पवारांनी म्हटलंय.
शरद पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं की, घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करायची असते. आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गँग शब्द आहे. आम्ही ही गँग कधी वाढू दिली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.
मी पक्षात मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. पण सत्ता नाही म्हणून सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि पहाटे शपथ घेतली, राज्यपाल यांना उठवले कशासाठी? चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळालं नाही म्हणून घर मोडायचं असतं का?, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
काँग्रेसने दुरुस्त केलेले “उत्तर” महायुतीला खडतर आव्हान!
सलमान खानला पुन्हा धमकी, तर झिशान सिद्दिकी रडारवर; फोन करत केली मोठी मागणी
“शूटिंग सुरु असताना मी सलमानला बाजूला घेऊन गेले आणि”,’या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा