मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी(Good news) दिली आहे. या बातमीने अभिनेत्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
ही गुडन्यूज(Good news) म्हणजे अभिनेता लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी प्रियांका ढवळे गरोदर असून हे जोडपं या नवीन वर्षात त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. पत्नी आणि अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अभिनेत्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकची ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न झाले. यानंतर शशांक आणि प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आणि त्याचे आनंदाने स्वागत केले.
अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे. आणि आता अभिनेत्याच्या आयुष्यात आणखी एका गोंडस बाळाचा प्रवेश होणार आहे. ऋग्वेद, शशांक आणि त्याची पत्नी प्रियांका या तिघांनी मिळून एकत्र मॅटर्निटी फोटोशूट देखील केले आहे. या तिघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेता शशांकने ही पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा होणार, ऋग्वेद दादा होणार आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा होणार यासाठी आम्ही तयार आहोत.” असे लिहून अभिनेत्याने ही गोड बातमी शेअर केली आहे.
शशांक आणि प्रियांका आई-बाबा होणार असल्याचं समजताच मराठी कलाकारांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तितिक्षा तावडे, तन्वी मुंडले, सुकन्या मोने, आशय कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सलील कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर या सगळ्या कलाकारांसह नेटकऱ्यांनी शशांकच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत केतकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा बातमीने अभिनेत्याच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
दरम्यान, शशांकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेता सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची सुद्धा चांगली पसंती मिळत आहे. शशांकसह या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तसेच ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.
हेही वाचा :
वाल्मीक कराड शरण आला सरकारचा मात्र लोच्या झाला
जानेवारी महिन्यात या दिवसांपासून लागत आहे पंचक, यावेळी करु नका कोणतेही शुभ कार्य
तरुणांनो नववर्षात रेल्वेत तब्बल ‘इतक्या’ जागा भरल्या जाणार