‘ती’ वेदनेने तडफडत होती… ; भुताने झपाटलं म्हणून महिलेला मारहाण केली अन्…

कर्नाटकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या आईला भुताने झपाटल्याचा संशयावरून मांत्रिकाकडे नेले. तिथे नियंत्रिक विद्या करणाऱ्या महिलेने(woman) भूत काढण्याच्या नावाखाली इतके मारहाण केली की तिचा तडफडत तडफडत मृत्यू झाला. ही मारहाण मुलासमोरच करण्यात आली आहे. ही घटना कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात घडली आहे. मृतकाचे नाव गीतम्मा आहे. याप्रकरणी तिघांविरुधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार, 6 जुलै रोजी घडली. गीतम्माचा मुलगा संजय याला वाटले की त्याच्या आईला भुताने पछाडलं आहे. त्यांनंतर तो तिला आशा नावाच्या महिलेकडे घेऊन गेला. आशा हिने असा दावा केला होता की ती भूत घालवण्यासाठी एक विधी करते. आशा आणि तिचा पती संतोष दोघेही गीतम्माच्या घरी गेली आणि कथित भूतबाधा सुरु केली.

तिने गीतम्माला(woman) बाहेर ओढले आणि सांगितले की तिला भुताने पछाडलं आहे. नंतर तिने तिला काठीने मारहाण करायला सुरुवात केली. आशा म्हणाली की आत्मा शरीरातून निघून जाईपर्यंत तिला मारहाण करणे आवश्यक आहे. म्हणून तिला मारहाण करण्यात आली. तिचा मुलगा संजय मारहाण होतांना पाहत राहिला. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेली मारहाण रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सुरू झाली आणि ती पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू होत. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गीतम्मा पाणी मागताना दिसत आहे.

गीतम्मा निपचित पडल्यानंतर आशाने दावा केला की आत्मा निघून गेला आहे. तिला घरी घेऊन जाऊ शकता. परंतु घरी पोहोचताच तिची प्रकृती आणखी बिकट झाली. संजयने तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सततच्या मारहाणीमुळे, गीतम्मा जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा संजय, आणि अशा आणि संतोष या तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे