गोंदिया : भाजप नेते आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला (current political news)रामराम ठोकला असून, आता ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची घोषणा केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अग्रवाल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

माजी आमदार गोपालदास अग्रवाल(current political news) यांनी नागपुरातील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशावेळी अग्रवाल यांनी ‘मी विकासासाठी प्रवेश करत आहे, मला ना कोणते मंत्रिपद हवे आहे, ना पक्षात मोठे पद हवे आहे’, असे सांगितले होते. मात्र, निष्ठेचा आदर न केल्याने मी आता भाजपचा राजीनामा देत घरवापसी करत असल्याचे सांगितले.
गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला आमचे प्राधान्य आहे. विकासाच्या लालसेपोटी भाजपमध्ये प्रवेश केला होता, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. आता मी भाजपमधून बाहेर पडणार असून, काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा रविवारी पत्रपरिषदेत केली. ते शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गोपालदास अग्रवाल गोंदिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या(current political news) तिकिटावर 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते पण 2019 मध्ये गोपालदास अग्रवाल भारतीय जनता पक्षात दाखल झाले. यानंतर गोपालदास अग्रवाल यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या टिकलमधून लढवली होती. तेव्हा त्यांचा पराभव झाला होता.
गोपालदास अग्रवाल म्हणाले, “मी गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षात आहे. पक्षाची सत्ता असतानाही गोंदिया विधानसभेचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष काँग्रेसमध्ये परतत आहे”.
हेही वाचा:
इतिहासकार फडणवीस आणि जयंत पाटील
गणपती मंडळावर दगडफेक; सहा जणांना अटक
‘या’ राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; नव्या नोकरीसह होणार धनलाभ