धक्कादायक! व्हर्च्युअल , नग्न फोटो अन्…, सिक्युरिटी गार्डकडून हजारो महिलांचा Instagram वर छळ

इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांना जाळ्यात (harassed)अडकवून त्यांचा छळ करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बेंगळुरू येथे राहणाऱ्या शुभम सिंग या २५ वर्षीय तरुणाने तांत्रिक कौशल्यांचा गैरवापर करत महाराष्ट्रातील अनेक महिलांना लक्ष्य केले. हा तरुण मूळचा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील असून तो बेंगळुरूतील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. शुभमने १०० हून अधिक बनावट Gmail अकाउंट्स तयार करून त्या माध्यमातून हजारो महिलांची बनावट प्रोफाइल्स उघडली. या खात्यांमधून महिलांचे खाजगी फोटो मॉर्फ करून अश्लील स्वरूपात शेअर केले जात होते. इतकेच नव्हे तर या प्रोफाइल्सवर बनावट दरपत्रक बनवून महिलांना सेक्स वर्कर असल्याचे भासवले जात होते.

महिलांनी हे बनावट प्रोफाइल हटवण्याची विनंती केल्यावर शुभम व्हिडिओ कॉलवर ‘व्हर्च्युअल सेक्स’ किंवा नग्न फोटोची मागणी करायचा. काही प्रकरणांमध्ये महिलांनी दबावाखाली त्याच्या मागण्या पूर्ण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकारामुळे अनेक महिलांना मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला.कांदिवली येथील एका नामांकित कॉलेजमधील १९ वर्षीय बीएससी विद्यार्थिनी शुभमच्या जाळ्यात अडकली.(harassed) तिच्या नावाने सलग तीन दिवस तीन बनावट इंस्टाग्राम खाती उघडण्यात आली. तिने दोन खाती ब्लॉक केली, पण तिसरे समोर आल्यानंतर तिने थेट सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतरच या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

शुभमने माहिती तंत्रज्ञानातील शिक्षण घेतले होते. ग्राफिक्स, कोरलड्रॉ, HTML, नेटवर्किंग अशा विविध तांत्रिक गोष्टींमध्ये तो प्रवीण होता. मात्र आयटी क्षेत्रात नोकरी मिळण्यात अपयश आल्याने त्याने एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. याच काळात त्याने आपली तांत्रिक कौशल्ये वापरून महिलांविरोधात ऑनलाईन गुन्हे करण्यास सुरुवात केली.

या गुन्ह्याचा तपास दहिसर पोलिसांच्या सायबर टीमने केला. डीसीपी महेश चिमटे, वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अंकुश दांडगे, पीएसआय श्रद्धा पाटील व वैभव ख्वाकर यांच्या पथकाने इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या नोडल अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास करून आरोपीचा आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक केला.बेल्लारी कर्नाटक जिल्ह्यातील सबदूर या गावात शुभम सिंगचा ठावठिकाणा शोधून रविवारी त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला मुंबईत आणून बोरिवली महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. (harassed)न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्…, Video Viral

बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण