सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS अधिकारी; एकदा नाही तर दोनदा केली UPSC क्रॅक; अपराजिता राय यांचा प्रेरणादायी प्रवास

यूपीएससी परीक्षा देण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यूपीएससी परीक्षा (upsc)देऊन आयएएस, आयपीएस होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकांचे प्रशासकीय सेवेत काम करण्याचे स्वप्न असते. परंतु अपयशाचा सामना करावा लागतो किंवा कधीतरी हवी ती रँक मिळत नाही. म्हणून पुन्हा प्रयत्न केले जातात. असंच काहीसं सिक्कीमच्या अपराजिता राय यांच्यासोबत झालं. त्यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा दिली.

अपराजिता राय या सिक्कीमच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी २०१० आणि २०११ मध्ये सलग दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी ट्रेनिंगदरम्यान (upsc)अनेक पुरस्कारदेखील जिंकले आहेत. त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं.

अपराजिता या यांचे वडील ज्ञानेंद्र राय हे सिक्कीममध्ये डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांच्या आईचे नाम रोमा राय होत. त्यांनी वडिलांकडे पाहूनच सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली.

अपराजिता राय लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या.(upsc) त्यांनी २००४ मध्ये आयसीएस बोर्डमध्ये ९५ टक्के गुण मिळवले होते. त्या ऑलराउंड विद्यार्थ्यांपैकी एक होत्या.

प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल अॅडमिशन टेस्ट पास केली. यानंतर त्यांनी २००९ मध्ये पश्चिम बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्समध्ये बीए एलएलबीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी न्यायशास्त्र आणि लोक प्रशासनमध्ये गोल्ड मेडल बनवले होते.

२००९ मध्ये अपराजिता यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली होती. परंतु काही कारणांनी परीक्षा क्लिअर केली नव्हती.अपराजिता राय यांनी पुन्हा एकदा यूपीएससी सिविल सेवा परीक्षा दिली. तेव्हा त्यांना ७६८ रँक मिळाली. परंतु त्यांना अजून चांगली रँक मिळवायची होती. त्यांनी २०११ मध्ये सलग तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि ३५८ रँक मिळवली. त्यानंतर त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

आयपीएससोबत खेळाडू

आयपीएस अपराजिता आयपीएस अधिकारी तर आहेत. याचसोबत त्या उत्तम खेळाडूदेखील आहे. ऑल इंडिया पोलिस बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये त्या रनर अप राहिल्या होत्या.त्यांच्या या गुणांचे सर्वांनाच कौतुक आहे.

हेही वाचा :

श्रावणी सोमवार विशेष : मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा; पुण्यातील उमा महेश्वर मंदिर

फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा