हिंदू पंचांगानुसार आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. हा महिना देवांचा देव महादेव यांना समर्पित मानला जातो. देवी पार्वतीचा उल्लेख नसल्यास महादेवाचा उल्लेख अपूर्ण मानला जातो. भारतीय संस्कृतीत देवी पार्वतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पार्वती देवी ही स्त्रीत्व, शक्ती, सौम्यता आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. देवी पार्वती ही सर्वच महिलांना(wife) प्रेरणा देते आणि नात्यासाठीही ती अपवाद नाही.

सध्या नात्यांमध्ये अनेकदा इतका दुरावा दिसून येतो. पण देवी पार्वतीचे गुण आपल्या अंगी बाणवल्यास तुम्हीही एक उत्तम बायको म्हणून नातं टिकवू शकता. इतकंच नाही तर एक चांगला जीवनसाथी बनण्यासाठी आपण देवी पार्वतीकडून कोणते गुण शिकू शकतो ते जाणून घेऊया .
समर्पण
देवी पार्वतीचे शिवाप्रती असलेले समर्पण अढळ होते. शंकराचे प्रेम मिळविण्यासाठी देवी पार्वतीने वर्षानुवर्षे तपस्या केली आणि शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त केले. यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की नात्यात खऱ्या समर्पणाने आणि निष्ठेने कोणताही अडथळा दूर करता येतो. आपलं प्रेम अढळ असेल आणि श्रद्धा असेल तर नात्यात कायम ते टिकून राहते आणि प्राप्त होते. आपल्या प्रेम करणाऱ्या माणसावर आपण नेहमीच समर्पित असावे
संयम
भगवान शिव ध्यानात कायम मग्न असतात असे म्हटले जाते. इतकंच नाही तर लग्न होण्याआधीही शिवशंकर अघोरी जीवन जगायचे पण पार्वतीने याबाबत कधीही तक्रार केली नाही. तिने संयमाने नातेसंबंध हाताळले. नात्यांमध्ये संयम हा सर्वात मोठा गुण आहे. संयमाने गोष्टी हाताळल्यास आपलं नातं दीर्घकाळासाठी टिकून राहते(wife). आपला जोडीदार कसा आहे आणि काय करत आहे याबाबत संयमाने निर्णय घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे वागावे लागते.
स्वाभिमान
पार्वती समर्पित होती पण तिचा स्वाभिमान कधीही विसरली नाही. जेव्हा शिवाने तिचा अपमान केला तेव्हा तिने तिच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी अग्नीत प्रवेश केला. स्त्री म्हणून स्वतःचा स्वाभिमान जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एखाद्यावर प्रेम आहे म्हणून आपला स्वाभिमान गहाण ठेऊन त्या व्यक्तीबरोबर राहू नये. तर आपला स्वाभिमानही तितकाच महत्त्वाचा आहे हे आपल्या वागण्यातून दर्शवावे. यातून आपण शिकू शकतो पत्नी असणे समर्पित असते परंतु स्वाभिमानाने राहणेही गरजेचे आहे.

संतुलन
शिवाच्या उग्रतेसमोर पार्वतीची सौम्यता नात्यात संतुलन निर्माण करते. चांगल्या नात्यात संतुलन महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचा जोडीदार रागात असेल तेव्हा तुम्हीही रागात असून चालत नाही(wife). हे नातं अधिक दुरावा निर्माण करते. त्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेऊन आणि संतुलन राखून तुम्ही नात्यात अधिक काळ एकत्र राहू शकता.
सहचारिणी
देवी पार्वती केवळ पत्नीची भूमिकाच बजावत नाही तर भगवान शिवासाठी मार्गदर्शक आणि मित्रदेखील आहे. ज्या नात्यात मैत्री नसेल, आदर नसेल ते नातं टिकू शकत नाही. सहचारिणी अर्थात आपल्या जोडीदाराला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी अशी पार्वती. त्यामुळेच संसार टिकून रहायला मदत मिळते आणि नातंही टिकून राहतं.
आदर्श पत्नीसाठी हे गुण खूप महत्वाचे आहेत. भोलेनाथची पत्नी म्हणून देवी पार्वतीचे हे गुण स्वीकारून, कोणतीही स्त्री आदर्श पत्नी बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकू शकते.
हेही वाचा :
पडळकर व आव्हाड यांनी जे पेरलं तेच उगवलं….!
धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या
युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो….– प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे