‘सिराज- आकाशदीप डूओ’ हिट! 407 धावांवर इंग्लडला गुडाळलं, वाचा सामन्याचा अहवाल

मोहम्मद सिराज यांनी संघासाठी सहा विकेट्स घेतले तर आकाशदीपने संघाला(team) चार विकेट्स मिळवून दिले. तिसऱ्या दिनी भारताच्या संघाने इंग्लंडला सर्व बाद करून सध्या भारताचा संघ तिसरा डावामध्ये फलंदाजी करत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्याचा तिसरा दिवस : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने 407 धावांवर दुसऱ्या डावांमध्ये इंग्लंडच्या संघाला रोखलं. या सामन्यात मोहम्मद सिराज याने आणि आकाशदीप या दोघांनी मिळून इंग्लंडच्या फलंदाजांच्या हालत खिळखिळी केली. (team)मोहम्मद सिराज यांनी संघासाठी सहा विकेट्स घेतले तर आकाशदीपने संघाला चार विकेट्स मिळवून दिले. तिसऱ्या दिनी भारताच्या संघाने इंग्लंडला सर्व बाद करून सध्या भारताचा संघ तिसरा डावामध्ये फलंदाजी करत आहे.

भारताच्या दोन गोलंदाजांनी संघासाठी चांगली कामगिरी केली. भारतीय संघाचे गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर मोहम्मद सिराज यांनी त्याचा अनुभवाचा उपयोग करून सहा विकेट्स (team)भारताच्या संघाला मिळवून दिले. जो रूट त्याचबरोबर जॅक क्रॉली यांसारख्या दिग्गज फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला शून्य धावावर पवेलियनचा रस्ता दाखवला. कार्स, टंग आणि बशीर या तिघांना शून्यावर बाद केले.

जसप्रीत बुमराहच्या जागेवर आकाशदीप आला संघामध्ये स्थान मिळाले होते त्याने स्वतःला सिद्ध केले आणि संघासाठी चार विकेट्स मिळवून दिले. मागील सामन्यांमध्ये शतक झळकावणारा बेन डकेट याला शून्यावर बाद केले. ऑली पॉप याला देखील बाहेरचा रस्ता दाखवला. हॅरी ब्रूक याने दुसऱ्या डावामध्ये 158 धावांची खेळी खेळली होती. त्याने दोन दिवस फलंदाजी केली भारताच्या संघाला हॅरी ब्रूक आणि जेमी स्मित या दोघांची 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली होती.

या भागीदारीला तोडून आकाशदीपने भारताच्या संघाला महत्त्वाचे विकेट मिळवून दिली. क्रिस वोक्स याला देखील आकाशदीपने बाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडिया सध्या तिसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने तिसऱ्या डावामधे १ विकेट्स गमावला आहे यशस्वी जयस्वाल याने तिसऱ्या डावामधे २८ धावांची खेळी खेळली. भारतासाठी केएल राहुल आणि करुण नायर दोघे फलंदाजी करत आहेत. तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर राहुलने २८ धावा केल्या आहेत तर करून नायर याने ७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट