पंतच्या तुटलेल्या पायावर अटॅक करणाऱ्या बेन स्टोक्सला सिराजने दाखवला इंगा, बॉल अशा ठिकाणी मारला की…

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे सुरु असलेल्या चौथ्या(match) टेस्ट सामन्यात मोहम्मद सिराजने टाकलेला बॉल इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला लागला. यामुळे तो वेदनेत दिसला.

नेमकं काय घडलं?
तिसऱ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना कर्णधार बेन(match) स्टोक्स स्ट्राईकवर होता. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टाकलेला एक बॉल आत येत होता. पण हा बॉल स्टोक्स नीट खेळू शकला नाही आणि बॉल थेट त्याच्या एब्डमन गार्डवर जाऊन लागला. यानंतर बेन स्टोक्स वेदनेनं कळवळा आणि थेट जमिनीवर बसला. स्टोक्सच्या पॅन्टला रक्ताचे काही थेंब सुद्धा दिसले. सिराज त्याचा जवळ गेला आणि चौकशी केली. बेन स्टोक्स थोडावेळ वेदनेत दिसला पण नंतर त्याने फलंदाजीला सुरुवात केली

116 वी ओव्हर पूर्ण झाल्यावर बेन स्टोक्सच्या पायाला क्रॅम्प आल्याने तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला त्याच्या ऐवजी जेमी स्मिथ हा मैदानात आला.

बेन स्टोक्सने पंतच्या जखमी पायाला केलं टार्गेट :
मँचेस्टर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्सने (match) टाकलेल्या 68 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर पंतने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि तो बुटावर आदळला. यावेळी पंतच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पायाला उजव्या पायावर मोठी सूज आली आणि थोडं रक्तही आलं होतं. तो त्यावर उभा राहू शकत नव्हता. यावेळी त्याला रिटायर्ड हर्ट म्हणून घोषित करून त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मैदानात येणार की नाही याबाबत शंका असताना शार्दूल ठाकूरची विकेट पडल्यावर पंत मैदानात फलंदाजीसाठी आला. त्याला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्या वाजवून त्याचं स्वागत केलं. यावेळी ऋषभ पंतने टीम इंडियासाठी 54 धावांची कामगिरी केली. यावेळी 3 चौकार आणि 2 षटकार सुद्धा लगावले. जखमी असताना सुद्धा ऋषभ पंत भारतासाठी जबरदस्त फलंदाजी करत होता, यावेळी इंग्लंडचा गोलंदाज बेन स्टोक्सने पंतच्या दुखापतग्रस्त असलेल्या पायावर पुन्हा टार्गेट केले. अनेकदा त्याने निर्दयीपणे पंतला जिथे जखम झालीये तिथेच बॉलिंग अटॅक केला. पण पंतने इंग्लंडचे हे प्रयत्न अयशस्वी केले आणि मैदानात टिकून राहत गोलंदाजी केली.

हेही वाचा :

Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
हरिद्वारला फिरायला जाताय? तर तेथील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
आजचा पहिला श्रावणी शनिवार राशी ठरणार भाग्यशाली! शनिदेवांचा आशीर्वाद आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा