काल ओव्हल कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा(team) हिरो मोहम्मद सिराज ठरला. त्याने या कसोटी सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीमुळे त्याला इतर खेळाडूंपेक्षा बीसीसीआयकडून जास्त पैसे मिळतील.

ओव्हल कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या ऐतिहासिक 6 धावांच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मोहम्मद सिराज ठरला. सिराजने सामन्यात एकूण9 बळी घेतले, ज्यामध्ये दुसऱ्या (team) डावातील 5 बळींचा समावेश होता. त्याच्या घातक गोलंदाजीने इंग्लंडला विजयापासून फक्त 6 धावांनी दूर ठेवले आणि भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
ओव्हल कसोटीत सिराजने भेदकक गोलंदाजी करत फक्त उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर संपूर्ण मालिकेत 23 बळींसह सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही बनला. त्याचं सातत्य आणि जिद्द, या पैलूंनी भारताला ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मालिकेतील सर्व सामने खेळणारा सिराज हा एकमेव भारतीय गोलंदाज होता.
प्रत्येक कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये निवडलेल्या खेळाडूंना (team) बीसीसीआय 15 लाख रुपये मॅच फी देते. सिराजला ओव्हल कसोटीसाठीही ही रक्कम मिळेल. पण यासोबतच, सिराजला बीसीसीआयकडून अतिरिक्त 5 लाख रुपये देखील दिले जातील, त्यामागे एक विशेष कारण आहे.
बीसीसीआयचा एक विशेष नियम आहे की जेव्हा एखादा गोलंदाज एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेतो तेव्हा त्याला सामना शुल्कासह 5 लाख रुपयांचा बोनस दिला जातो. दुसऱ्या डावात 5 बळी टिपल्याने सिराज या विशेष बक्षीस रकमेचासाठीही पात्र ठरणार आहे.
ओव्हल कसोटीतील संस्मरणीय कामगिरीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र, इंग्लंडमध्ये सामनावीर होण्याबद्दल पैसे देण्याचा कोणताही नियम नाही, जसे भारतात सहसा घडताना दिसतं. खेळाडूला ट्रॉफीसह चेक देखील दिला जातो.
हेही वाचा :
मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना दोन कोटींचा भुर्दंड, काहींची मुजोरी सुरूच…
प्रसिद्ध अभिनेत्याचा कारमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण…
प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश