“ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी सर्वांत शांत झोपलो…”; भाजप नेत्याची तुफान राजकीय टोलेबाजी

लातूर : राज्याचे वातावरण सध्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटवेवरुन तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या पुतळ्याच्य निर्माण कार्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर हा पुतळा वाऱ्यामुळे पडला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता पुतळा कोसळल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी माफी देखील मागितली.

मात्र ही माफी राजकीय असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने देखील राज्यव्यापी आंदोलन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली.

भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या जाडे मारो आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलव केली. महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांवरुन राजकारण करत असल्याचा सूर या आंदोलनाचा होता. लातूरमध्ये माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने आंदोलन केले.

आंदोलनानंतर संवाद साधताना रावसाहेब दानवे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. रावसाहेब दानवे हे त्यांच्या खास शैलीतील भाषणासाठी नावाजले जातात. गावरान बोलीभाषा आणि त्यात ठसकेबाज म्हणींचा वापर यामुळे रावसाहेब दानवे यांचे भाषण नेहमी गाजते. आणि त्यांच्या भाषणाची चर्चा सुद्धा होते. आता आंदोलनावेळी रावसाहेब दानवे यांनी सोशल मीडियाचा प्रसंग सांगितल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

लातूरमध्ये बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, कोणत्याही गोष्टीचं राजकारण विरोधकांनी करू नये असे आमचे आवाहन आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याप्रकरणी काँग्रेसकडून माफी मागा म्हणून आंदोलन करण्यात आलं. यावर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माफी मागितली.

आमच्या संस्कृतीमध्ये माफी मागायला सुद्धा आम्ही मागे पुढे बघत नाही. आंदोलनाला प्रति आंदोलन काढण्यापेक्षा चांगल्या कामाला चांगलं म्हणा आणि वाईट म्हणा. त्यांच्या काळातही कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला. हे तर नैसर्गिक वातावरणामुळे पुतळा पडला आणि म्हणून त्यांच्या काळात काढलेल्या पुतळ्या संदर्भात आम्ही आंदोलन करू, असा इशारा रावसाहेब दानवे यांनी दिला.

माजी खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून पराभव झाला. आता त्यांनी या पराभवाबाबत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. दावने म्हणाले की, मतं विकासावर पडतात यावर माझा आता विश्वास राहिला नाही. माझ्या मतदारसंघात सहा हजार कोटींची विकास कामे केली. Dray Port सुरू केलं.

जालन्यात अनेक विकास कामे केली तरीही मी पडलो. कारण मला निलंगेकर यांच्यासारखी यात्रा काढता आली नाही. मला देखील अशी यात्रा काढावी लागेल. गढी ते जरंडी अशी मी त्यावेळी यात्रा काढली होती,कापसाला भाव द्या अशी मागणी प्रामुख्याने मांडली होती.

सोशल मीडिया वापरू नका असे धस यांनी सांगितले. मी आयुष्यात कधी सोशल मीडिया बघितला नाही. कमेंट पण नाहीत. बायको म्हणते सोशल मीडियात असं आले आहे, मी म्हणतो गप झोप, जाऊ दे. मी ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी सर्वांत शांत झोपलो, अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी कबुली दिली.

हेही वाचा:

‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ

तिकीट नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्षांनी थेट राजीनामाच दिला

ताराराणी पक्ष विधानसभेच्या सहा जागा लढवणार! इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळमध्ये….