मेष
सप्ताहात सुरुवातीला जोडीदाराकडून मोठे सहकार्य मिळेल. भागीदारीत मोठे लाभहोतील.(partner stack) वारसा हक्क, पेन्शन विमा संबंधित कामात यश मिळेल. भाग्यस्थानात होणारी पौर्णिमा भाग्योदयकारक राहील.

वृषभ
नोकरीत चांगले बदल होतील. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. (partner stack)आरोग्यात उत्तम सुधारणा होईल. सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीतील व्यवसायाची संधी मिळेल.
मिथुन
मुलांसाठी मोठे खर्च होतील. शेअर मार्केटमध्ये मोठा फायदा होईल.(partner stack) सप्ताहात दूरचे प्रवास होती. नोकरी निमित्ताने प्रवास करावे लागतील.
कर्क
घर, जागा, प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीची कामे होतील. घर, जागेमधून मोठे लाभहोतील. वाहन, उंची वस्तूंची खरेदी होईल. सप्ताहात मुलांचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह
सप्ताहाच्या सुरुवातीला छोटे प्रवास, सहली कराल. भावंडे, नातेवाइकांचा सहवास लाभेल. आनंदाची बातमी कळेल. सप्ताहात घर, जागा, वाहन विक्रीचे व्यवहार होतील.
कन्या
कुटुंबात आनंदाची घटना घडेल. आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. धनसंचय होईल. मोठी गुंतवणूक होईल. सप्ताहात छोटे प्रवास, सहली होतील.
तूळ
सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. वारसा हक्काची कामे होतील. सप्ताहात कौटुंबिक कामात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.
वृश्चिक
मोठे प्रवास होतील. विवाह समारंभासाठी मोठे खर्च होतील. परदेशगमनासाठी प्रयत्न होतील. कर्जाची कामे होतील. सप्ताहात आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी उत्साही राहील. तरुणांचे विवाह जमतील.
धनू
मित्रांचा सहवास मिळेल. पार्टी, मनोरंजन यासाठी खर्च कराल. नोकरीत मनासारखे बदल होतील. सप्ताहात मोठे प्रवास होतील. कर्जमंजूर होईल. मोठे खर्च कराल. हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल.
मकर
राजकीय सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. अधिकार, मोठे पद मिळेल. समाजात मोठे आर्थिक लाभ होतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
कुंभ
कलाकारांना प्रसिद्धी, नावलौकीक मिळेल. महत्त्वाची बातमी कळेल. समाजात नवीन नोकरी व्यवसायाची संधी मिळेल. सामाजिक-राजकीय कार्यक्षेत्रात पद, प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांची मर्जी राखाल.
मीन
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात काळजी घ्यावी लागेल. विमा, वारसा हक्क, पेन्शनची कामे होतील. अनपेक्षित लाभहोतील. सप्ताहात तीर्थयात्रा, धार्मिक विधी होतील. प्रसिद्धी, नावलौकीक मिळेल. गुरुजनांचा सहवास, आशीर्वाद लाभेल.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं