मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्…

सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात (massage)मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला. पोलिसांनी पार्लरचालक महिलेला अटक केली आहे.

जोयश्री नरेन तामोली (वय ३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या (massage)मसाजपार्लर चालक महिलेचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात डे स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला.

मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली हिला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस अधिक तपास करत आहेत.

पुण्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पुणे पोलीस देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस हवालदार प्रीती मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लर चालक सुनीता नामदेव मांजरे (वय ३३) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

पक्षाला सोडून जाणारे कंस आणि रावणाचे वंशज…”; खासदार संजय राऊतांची गंभीर टीका

हो आपण गाफिल राहिलो म्हणूनच…; पवारांकडून जाहीर कबुली अन् …

फणा काढत मुंगुसासमोर डिंग्या मारत होता नाग, तितक्यात बदलला खेळ; जीवघेण्या लढतीचा Video Viral